Header Ads Widget

नायगाव तालुक्यात एकूण तीस हजार पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांचे खाते तर अंदाजे पाच हजार शेतकऱ्यांना सदरच्या योजनेचे पैसे मिळेना ? सदरच्या फायली वाघमारे यांच्याकडे धुळखात - तहसीलदार गजानन शिंदे यांनी लक्ष द्यावे -

               माधव पवार
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत मिळणारी दोन हजार रुपयाची रक्कम नायगाव तालुक्यातील तीस हजार शेतकऱ्यांना मिळत असली तरी सदरच्या योजनेचा लाभ या पैकी पाच हजार शेतकऱ्यांना सदरच्या योजनेतील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे दिसून येत असून नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे

नायगावचे महसूल सहाय्यक पी एम किसान सन्मान योजना विभाग दीपक वाघमारे यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या कडून शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्जाचा निपटारा होत नसल्याने व करत नसल्याने शेतकऱ्याना मोठा अडचणीला सामोरे जावे लागत असल्यामुळे सदरच्या कर्मचाऱ्यांकडे दिलेल्या अर्जाच्या फायली धुळखात पडल्या आहेत काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे 

नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी महसूलचे सहाय्यक पी एम किसान सन्मान योजना विभाग दीपक वाघमारे यांच्याकडे दिल्यामुळे या नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याचे कामे होत नसल्याचे सदरच्या शेतकऱ्यांतुन बोलल्या जात आहे

तालुक्यातील तीस हजार शेतकऱ्यांचे खाते उघडण्यात आले आहेत म्हणजे पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असल्याचे कागदावर असले तरी अंदाजे पाच हाजर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगण्यात येते सदरच्या योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महसूल सहायक यांच्याकडे शेतकरी अर्ज दिले असले तरी धूळखातच असल्यामुळे शेतकऱ्यांना सदरच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव चित्र नायगाव तालुक्याचे आहे 

एकूण गावे ८९ असले तरी नायगाव तालुक्यात एकूण तीस हजार पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांचे खाते आहेत तर अंदाजे पाच हजार शेतकऱ्यांना सदरच्या योजनेचे पैसे मिळत नसल्याचे सांगण्यात येते ? सदरच्या फायली वाघमारे यांच्याकडेच धुळखात असल्यामुळे नायगाव तहसीलदार गजानन शिंदे यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे 

Post a Comment

0 Comments