काँग्रेस पक्षाची माजी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य महामार्गावर रंगरंगोटी करण्या बरोबर झाडे ही रंगविले रस्त्यात कुठे खेड्डे दिसू नये म्हणून खेडे ही बुजवून टाकले मोठया प्रमाणात खर्च करीत असताना त्या खर्चात नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरील असलेल्या गावा गावांत बस्टॅन्डच बांधले नसल्यामुळे प्रवाशासह जनतेला अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरून राहुल गांधी यांची भारत जोडो पद यात्रा निघाली होती या यात्रे दरम्यान इंदोर कल्याण टोलनाका धारकासह सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयाचा खर्च केला परंतु घुंगराळा व कृष्णूर येथे जनतेसाठी व प्रवासासाठी प्रवासी निवारा बांधला नसल्यामुळे दोन्ही विभागाचा गलथान कारभार जनतेला सोसावा लागत आहे
नायगाव तालुक्यातील घुंगराळा व कृष्णुर येथील प्रवासी निवारा पावसाळ्या पूर्वी या गावांत बस्टॅन्ड बांधा अन्यथा या दोन्ही गावातील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
नायगाव तालुक्यातील घुंगराळा व कृष्णुर हे जिल्ह्यात प्रसिद्ध असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह कल्याण टोल नाक्याच्या हलगर्जी पणामुळे प्रवासी निवारा बांधण्यात आला नसल्यामुळे ते तात्काळ या बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात येत असली तरी घुंगराळा व कृष्णुर या गावातील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे

0 Comments