माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून नरसी ते उमरी सावरखेड मार्गे दिनांक १ मे २०२३ रोजी बसचालू करण्यात आली आहे
सदरची बस चालू करण्यात यावी म्हणून बाबुराव तोडे यांनी प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हट्ट धरला होता त्यांची दाखल घेऊन चव्हाण यांनी बस सेवा चालू केली असल्याने गावकऱ्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
भावी आमदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह गावकऱ्यानी बिलोली राज्य परिवहन मंडळाच्या वाहतूक निरीक्षक विशाल भगवानराव निवंडगे यांचे जाहीर आभार मानले आहेत
सायंकाळी ५ वाजता आंतरगाव नगरीत बसचे आगमन झाले त्यावेळी माजी आमदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी सदरील बस सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते
सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोडे आंतरगावकर यांनी सदरील सोहळा करून दाखविण्यासाठी जागोजागी बॅनर झळकविले होते ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी सदरची बस सेवा माजी आमदार पुत्र रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अगर प्रमुखांशी चर्चा करून सदरची बस चालू करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याने हिरवा कंदील दाखविला होता
आंतरगावचे सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोडे यांनी सांगितले सदरची बस या मार्गावर पूर्वीही चालू होती परंतु काही कारणास्तव व काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची बस बंद करण्यात आली होती परंतु सदरची बस पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी मोठे प्रयत्न केले आहेप्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या पाठपुराव्याला सहमती दर्शविली होती राज्य परिवहन महामंडळाचे बिलोली अगरचे वाहतूक निरीक्षक विशाल निवंडगे यांनी बस चालू केली असल्यामुळे गावकऱ्यानी सदरची बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रा रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले आणि हिरवा कंदील दाखवुन बाबुराव तोडे यांना शाबासकी दिली आहे
सदरची राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक यांचे स्वागत करण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी घुंगराळा सावरखेड आंतरगाव मनूर इज्जतगाव बळेगाव तळेगाव उमरी या ठिकाणी बाबुराव तोडे यांनी मोठ मोठाले बॅनर झळकविले आणि प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांचे गावकऱ्याच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले

0 Comments