नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील शंकर नगर परिसरात दिनांक १ मे २०२३ रोजी दुपारी पावणे पाचच्या अंदाज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीने पुन्हा धुमाकूळ माजविल्यामुळे व मेघ गर्जनेसह गाराचा पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांचे दोन जनावरे दगावले असल्याची माहिती मिळत असून सदरच्या हानीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे
जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या शंकर नगर विभागात गेल्या चार ते पाच दिवसापासून अवकाळी पाऊस पडत असल्याने व विजा चमकून कोसळत असल्याने शेतकऱ्यासह जनता हतबल झाली असल्याचे वास्तव चित्र या भागात दिसून देत असून शेतकऱ्यांच्या पिकाची ही मोठे नुकसान झाले आहे
आणि दोन जनावरे मृत्यू मुखी पडले असल्याची माहिती समोर येत असून महाराष्ट्र शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी या भागातील जनतेने मागणी केली आहे
नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गेल्या दोन ते तीन दिवसापासून गाराचा पाऊस पडत असल्याने टाकळी बु येथे रेड्डी यांची म्हैस तर धुप्पा येथे त्र्यंबक यांची गाय मृत्यू पावल्याची घटना घडली असल्याने एक ते सव्वा लाख रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
उन्हाळी लागवडीची मोठी हानी होत असताना देखील प्रशासन पंचनामे करण्यासाठी कोणत्या ही तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेश दिले नसल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाल्याचे वर्त असून त्याच बरोबर बिलोली तालुक्याच्या शंकर नगर भागात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन दोन जनावरे मृत्यू मुखी पडले असल्याचे वास्तव रित्या बातमी ऑनलाइन प्रकाशित करण्यात येत आहे

0 Comments