Header Ads Widget

वाळकी बाजार येथे जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी १६ लोकांवर हदगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - गावात तणाव पूर्ण शांतता


नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क : हदगाव :-:

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील मौजे वाळकी बु साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसरात जमलेल्या नागरिकाना गावातीलच काही लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात एकूण १६ जणावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची घटना ही दिनांक १५ मे २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली असून सदरच्या घटने प्रकरणी गावात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले तर गावात तणावपूर्ण शांततेचे वातावरण असले तरी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे

तालुक्यातील वाळकी बु. रहिवासी असलेले सदरच्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपीना सदरचे नागरिक मागासवर्गीय असल्याचे माहित असताना सुद्धा आरोपी परमेश्वर कदम, सुदर्शन कदम, बालाजी कदम, विश्वनाथ कदम, गजानन कदम, दिगंबर कदम, भागवत कदम,शेषराव कदम, दीपक कदम, गजानन कदम, योगेश कदम अमोल कदम, संदीप कदम,संतोष कदम, राजू कदम, चंदू कदम यांनी अन्य लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्यामुळे हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरील जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणातील फिर्यादी दिगंबर गायकवाड यांनी दिल्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली या प्रकरणातील सदरच्या आरोपींला अटक करण्यात आल्याचे कळते सदर प्रकरणी पोलीस उपअधीक्षक तथा भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड पुढील तपास करीत आहेत 

पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत फिर्यादी दिगंबर  गायकवाड यानी असे म्हटले सदरच्या आरोपी कडून  मारहाण जबरी चोरी गैर कायद्याची मंडळी जमवून जातिवाचक शिवीगाळ करून धमकीवेने इत्यादी प्रकरणी ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे

 





Post a Comment

0 Comments