Header Ads Widget

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची बुलंद तोफ खासदार संजय राऊत यांच्या मेळाव्याला तमाम शिवसैनिकानी उपस्थित राहण्याचे - रवींद्र पाटील भिलवंडे नरसीकर यांचे आवाहन

        माधव पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राजकीय वर्तुळात वादळ उठवणारे मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे दमदार नेतृत्व असलेले खासदार संजय राऊत यांची नांदेड येथे दौरा व मेळावा दिनांक १९ मे २०२३ रोजी असल्यामुळे नायगाव तालुक्यातून सदरच्या मेळाव्यास तमाम शिवसैनिक उपस्थित राहण्याचे नायगाव तालुका अध्यक्ष विद्यमान रवींद्र शिवाजीराव पाटील भिलवंडे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना आवाहन केले आहे 

राज्याच्या राजकारणात आणखी हे राजकीय संकटाला सामोरे जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला बळ देणारे रोखठोक तोफ खासदार संजय राऊत यांच्या विशेष उपस्थिती मध्ये नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालय तमाम शिवसैनिकांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे

"आले संकट आर पार तरी डगमगेना शिवसेनेचा नेता "

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व व काँग्रेस पक्ष या महा विकास आघाडी राज्यात एकत्रितपणे काम करीत असल्यामुळे  अख्या राज्याचे लक्ष वेधून घेणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नांदेड येथे होत असलेल्या दिनांक १९ मे २०२३ रोजीच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन करणारे खासदार राऊत यांच्यावर अनेक आलेले आरपार संकटाचा सामना करणारा शिवसेनेचा नेता यांचा नांदेड येथे विशेष मेळावा होणार आहे 

सदरच्या मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलवंडे यांनी दिनांक १९ मे रोजी शिवसैनिकानी चलो नांदेड असे म्हणाले आहे 

राजकीय संकटाला बळी न जाणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे दमदार विद्यमान खासदार संजय राऊत यांचा भव्य मेळावा नांदेड येथे आयोजित करण्यात आला आला असून या सदरच्या मेळाव्याला शिवसेनेची ताकद व बळ दाखविण्यासाठी बहादर शिवसैनिकांनो नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास उपस्थित राहावेत

जिल्हास्तरीय मेळाव्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन करणार असल्याने चलो नांदेड असे आवाहन नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलवंडे यांनी केली आहे 


Post a Comment

0 Comments