Header Ads Widget

निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी लावणार अनेक जिल्हा परिषद गट वाऱ्यावर विकासाचा बट्ट्या बोळ !!

               माधव पवार
सन २०२२ साला पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना अचानकपणे निवडणूक आयोगाने सदरच्या निवडणुका रद्द केल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे राजकीय पुढारी परत एकदा आपापल्या भवल्यावर जाऊन बसल्याचे चित्र राज्यात पाहावयास मिळाले आहे

निवडणूक आयोगाच्या मनमनीमुळे सदरच्या निवडणुका  लांबनीवर ढकलण्यात आल्या व ते निवडणुका कधी घेणार असा ही प्रश्न जनतेला पडला आहे

राज्यात गेल्या वर्षापासून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात राजकीय नेते मंडळी गुंतले असल्यामुळे निवडणूक आयोग निवडणूका लावण्याचे व घेण्याचे नाव घेत नसल्याने सदरच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तात्काळ घेतल्या तर राज्याच्या राजकारणाला योग्य दिशा मिळेल असे जनतेला वाटत आहे

ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल सदरचा चालत असलेला खेळ खंडोबा बंद होत नसल्यामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती सध्याच्या परिस्थितीत वाऱ्यावर आहेत.

सन दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका लागत असल्यामुळे राजकीय नेते मंडळी व निवडणूक आयोग सदरच्या ही निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करतील काय ? असा प्रश्न जनसामान्य माणसाला भेडसावत आहे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात गेल्या वर्षी ढोल वाजले होते परंतु अचानक वाजलेले ढोल बंद पडल्यामुळे व राजकारणाचा खेळ खंडोबा झाल्याने निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यास तयार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments