राजकारण आणि राजकारणातून निघणारे मार्ग अतिशय सोपे आणि अवघड ही असतात परंतु राज्याचा इतिहास जर पाहिला तर भाजपा पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकत्रपणे राज्याचा कारभार चालवत आहे
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी मध्ये शिंदे गटाला बाजूला ठेवत काँग्रेस पक्ष व भाजपा पक्ष सदरच्या निवडणुकीत सक्रिय होऊन एकत्रितपणे निवडणुका लढविण्यासाठी सज्ज झाले होते
नायगाव तालुक्याच्या कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या निवडूनका लढविण्यात आल्या आहेत
कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप युती केल्याच्या नंतर सदरच्या मार्केट कमिटीवर राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या गटाचे दहा तर बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्या गटाचे आठ उमेदवार निवडून आले आहे
कुंटूर मार्केट कमिटीचे नूतन सभापती अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी व उपसभापती मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांची सदरच्या मार्केट कमिटीवर निवड झाली असल्यामुळे बरबडा जिल्हा परिषद गटातील जनता उत्साहीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
आगामी काळातील लोकसभेच्या निवडणुका असो की विधानसभेच्या निवडणुका असो अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची काँग्रेस आणि भाजपाची युती का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे

0 Comments