नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यासह सन २०२१ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत सरपंच व सदरील सदस्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून विजयी झाले होते त्या सदस्यांनी जात पडताळणी समिती कडून वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे आरक्षणाच्या जागेवरून निवडून आलेले तालुक्यासह ग्रामीण भागातील ११२ ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदसत्व रद्द केले आहे
जिल्हाधिकारी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदरच्या केलेल्या कारवाईत ग्रामपंचायत कार्यालयाचे काही सरपंच आणि सदस्याचा पोपट बाहेर पिंजरा खाली झाला म्हणण्याची वेळ आली आहे
नायगाव तालुक्यातील व खेड्यापाड्यातील काही गावांच्या सरपंचाचा ही सदरच्या जिल्हाधिकाऱ्यानी केलेल्या कारवाईत समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत असून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयने जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्यांना चांगलाच दणका बसला असल्यामुळे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात एकच खळबळ उडाली आहे
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशा मध्ये सन २०२० सालाच्या कार्यकाळात ग्रामपंचायत कार्यालयाच्या कालावधीची मुदत संपली असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुका लावण्यासाठी सदरचा निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला होता
त्यानुसार दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान करण्यात आले होते व १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी सुद्धा पार पडली होती परंतु आरक्षणाच्या माध्यमातून निवडून आलेले सरपंच व सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नसल्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांचे ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्यत्व रद्द केले असल्याने एकच खळबळ खेड्यापाड्यात उडाल्यामुळे चर्चेला मोठ्या प्रमाणात उदान आले आहे

0 Comments