Header Ads Widget

माहूरच्या जंगलात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची चोरलेली पिस्टल अखेर पोलिसांनी सात महिन्याच्या नंतर केली जप्त आरोपी पोलिसांच्या ताब्यात २ दिवसाची पोलीस कोठडी

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या माहूर येथील जंगलात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पिस्टल यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी असलेला अटेल गुन्हेगार आरोपी जावेद अब्दुल सत्तार वय वर्ष ३४ ते ३५ वर्ष यांनी जंगलात लपून ठेवलेली पिस्टल अखेर पोलिसांच्या शोध मोहिमेत सापळा असून सदरच्या आरोपीला ताब्यात घेतले त्यांनी जंगलातील जमिनीत लपून ठेवलेली पिस्तूल पोलिसांना काढून दिल्यामुळे सदरच्या आरोपीसह पिस्टल  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे 

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रहिवासी असलेला  गुन्हेगार आरोपी जावेद अब्दुल सत्तार यांनी नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यात येऊन वनपरिक्षेत्र अधिकारी यांची पिस्टल गेल्या सात महिन्या खाली चोरली होती होती

यवतमाळ जिल्ह्याच्या  आरोपीच्या शोधामध्ये पोलीस होते परंतु अखेर पोलिसांना आरोपीसह पिस्टलचा शोध लागल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली तर पिस्टल जप्त करण्यात आली आहे 

माहूर येथील क्रीडा संकुलच्या बाजूस असलेल्या एका खडडयात सदरची पिस्टल आरोपीने लपवून ठेवली होती अखेर सदरच्या पोलिसांना आरोपीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पेस्टल चोरली असल्याची कबुली दिली आहे

ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जेमादार विजय आडे पो.हे.कॉ. बाबू जाधव पो.कॉ. सुशील राठोड,जिप चालक गुरनुले यांनी सदरील घटनेची पाहणी करत खड्यात लपवून ठेवलेली पिस्टल काढून दिली आहे



Post a Comment

0 Comments