Header Ads Widget

श्री रेणुका माता मंदिराच्या दर्शनासाठी कॅप्सूल लिफ्ट व स्काय स्काय वॉक उद्घाटनाच्या प्रसंगी हिमायतनगर तालुक्यातील रस्ता जोडण्यासाठी बाबुराव कदम कोहळीकराचे नितीन गडकरी यांना निवेदन

 
हिमायतनगर : नागोराव शिंदे :- 

हिमायतनगर तालुक्यातील नवीन रस्ते निर्माण बाबत खासदार हेमंत पाटील आ भीमराव केराम त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले तसेच हिमायतनगर पासून किनवट ह्या नॅशनल हायवे रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल व मागील पाच वर्षापासून हे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्यामुळे संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करण्या संदर्भात सूचना दिल्या आहे

मंत्री गडकरी यांच्या सोबत बैठकीत आ. भिमराव केराम किनवट हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर हिमायतनगर भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान भाजपा तालुकाध्यक्ष किनवट संदिप केंद्रे  शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे हिमायतनगर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी भाजपा नेते किशनराव वानखेडे यावेळी होते
शेख लतिफ याणी रस्ते संदर्भात  मंत्री नितीन गडकरी सोबत  झालेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात तक्रार केल्या नंतर तातडीने  नितीन गडकरी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवून त्या गुत्तेदाराला टर्मिनेट करणे व कायदेशीर कारवाई करण्याचा संदर्भात सूचना सुद्धा केलेले आहेत तसेच

 हिमायतनगर तालुक्यामध्ये नवीन श्रीशक्तीपीठ जोडो महामार्गासाठी निवेदन सुद्धा देण्यात आले हे महामार्ग तेलंगणा राज्यातील कुबेर डोडरना वाशी पार्डी हिमायतनगर पळसपुर डोलारी गांजेगाव मार्ग ढाणकी पर्यंतअंदाजे ४५ किलोमीटर हे नॅशनल हायवे मध्ये रूपांतरित करून नवीन रस्ते निर्माण करावे असे निवेदन सुद्धा खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आले येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता नक्की पूर्ण करून देऊ असे आश्वासन माननीय गडकरी यांनी  दिले आहे

यावेळेस भाजपाचे तालुका उपाध्यक्ष श्री किसनराव वानखेडे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments