Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीच्या नूतन सभापती अंबादासराव धर्माधिकारी तर उपसभापती पदी म्हणून मनोज पाटील मोरे टाकळीकर यांची निवड भाऊजीच्या डिसिजन मध्ये दाजी झाले सभापती !!

        
         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकडे अख्या तालुक्याचे लक्ष लागले होते माजी मंत्री तथा खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश देशमुख कुंटूरकर यांच्याकडे मोठा पेच निर्माण झाला होता मार्केट कमिटीच्या निवडी मध्ये सभापती कोण ? प्रश्न निर्माण झाला यात आपले मेहुणे अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी की बंधू रुपेश देशमुख कुंटूरकर सभापती असे अनेकातून चर्चा रंगली होती

आपला बंधू रुपेश देशमुख कुंटूरकर यांना करायचे हे की दाजीला सभापती करायचे यांचे डिसिजन राजेश देशमुख कुंटूरकर यांच्याकडे होते परंतु अखेर कुंटूरच्या मार्केट कमिटीचे नूतन सभापती म्हणून अंबादासराव धर्माधिकारी तर उपसभापती म्हणून मनोज पाटील मोरे टाकळीकर यांची निवड करण्यात आली आहेनायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक काल परवाच शांततेत पार पडली आणि सदरच्या खुर्चीवर सभापती म्हणून विराजमान करण्यासाठी भाजपाचे राजेश देशमुख कुंटूरकरांना पर्याय शोधवा लागला असला तरी  एकीकडे थोरले भाऊजी बरबडेकर होते 

तर दुसरीकडे छोटे बंधू रुपेश देशमुख कुंटूरकर होते त्यामुळे कुंटूरकर यांना योग्य पद्धतीने डिसिजन घेऊन माजी मंत्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई यांच्यासाठी  राजेश देशमुख कुंटूरकर यांना दोन पाऊल मागे घ्यावे लागले आणि आपल्या दाजीला कुंटूर मार्केट कमिटीच्या सभापती पदी पदावर विराजमान करावे लागले आहे

तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक ही काँग्रेस पक्ष आणि भाजपात युतीच्या पॅटर्नचा प्रयोग करावा लागला या मार्केट कमिटीवर काँग्रेस व भाजप युतीची सत्ता असणार आहे

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड, व प्राचार्य मनोहर पवार यांनी भाजपाचे राजेश देशमुख कुंटूरकर यांच्यात युती करावी लागली आहे

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत कुंटूरकर गटाचे १० तर काँग्रेस पक्षाचे ८ असे सदरच्या निवडणुकी मध्ये उमेदवार निवडून आल्याने या कुंटूरच्या मार्केट कमिटीवर भाजप आणि काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्यात आलेली असली भाऊजीच्या डिसिजन मध्ये दाजी सभापती झाले आहेत 

Post a Comment

0 Comments