माधव पवार
महाराष्ट्रात अस्तित्वात असलेले सरकार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे सरकार हे जनसामान्यांसह शेतकऱ्याचं सरकार असल्याचे सांगतात परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील मागील अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले होते
शेतकऱ्यांना अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचा अद्याप पीक विमा कंपनी कडून पूर्ण मिळाला नाही केवळ तुटपुंजी विम्याची रक्कम देण्यात आली असली तरी शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून पूर्ण विमा देण्यात आला नसल्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचं कसं असा सवाल शेतकऱ्यानी केला आहे
राज्यातली येडी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्याप कोणताही योग्य निर्णय घेतला नसल्यामुळे व पिक विमा मिळाला नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत असताना सुद्धा सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही एकीकडे सरकार म्हणतो आमचं सरकार शेतकऱ्यांचे दुसरीकडे शेतकऱ्याला तूट पुंजा विम्या शिवाय दुसरं काही मिळाले नसल्याचे शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा विचार करून सदरचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यासाठी विमा कंपनीला सूचना द्याव्यात असे ही सदरच्या शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे

0 Comments