Header Ads Widget

सन २०२४ मधील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना ग्रामीण भागात गतिमान करण्याची गरज !!

        माधव पवार
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करीत असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना राज्यात एकत्रित पणे काम करीत असताना सन २०२४ मधील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ग्रामीण भागात गतिमान करण्यासाठी शिवसेनेच्या पदधिकाऱ्यानी जोर लावला पाहिजे असे जनतेचे मत आहे

राज्यात ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गतिमान असल्याचे दिसून येते परंतु ग्रामीण भागात मात्र शिवसेना मनावे तशी गतीमान असल्याचे दिसत नाही त्यामुळे शिवसेनेच्या नांदेड जिल्ह्यातील पुढाऱ्यानी सदरची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना मजबूत करण्यासाठी अंग झाडून उठले पाहिजे असी चर्चा जनतेतून ऐकावयास मिळत आहे

जिल्ह्यात बऱ्याच पैकी गावांत शिवसेनेच्या शाखा असल्या तरी अनेक गावांत शिवसेनेच्या शाखा ओपन करण्याची गरज व शाखा प्रमुखाची नेमणूक करणे आवश्यक असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधवराव पावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या तालुक्यात तालुक्यात नेमणूक करण्यासाठी संबंधित तालुका अध्यक्षाना सूचना करणे ही गरजेचे आहे

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गतिमान करण्यासाठी शिवसेनेच्या दमदार पदधिकाऱ्यानी कामाला लागले पाहिजे असे जन सामान्य माणसासह जनतेचे मत आहे 

Post a Comment

0 Comments