Header Ads Widget

रिपब्लिकन सेनेच्या बिलोली शहराध्यक्षपदी गंगाधर ईबितकर तर तालुकाउपाध्यक्ष चंद्रकांत आंबेकर यांची उपध्यक्ष निवड


बिलोली : नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क - 

नांदेड जिल्हातील बिलोली येथे इंदु मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेना पक्षाचा विस्तार करण्यासाठी बिलोली  येथे  दिनांक ०७ मे  २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह बिलोली येथे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मांजरमकर यांच्या सुचनेनुसार एक महत्व पूर्ण बैठक संपन्न झाली आहे

बिलोली येथे शासकीय विश्राम ग्रहात घेण्यात आलेल्या बैठकीत रिपब्लिकन सेनेच्या बिलोली शहराध्यक्षपदी गंगाधर ईबितकर रिपब्लिकन सेनेच्या बिलोली तालुका उपाध्यक्षपदी चंद्रकांत आंबेकर तालुका संघटक जेठे खंडू, युवा तालुका महासचिव सिद्धोधन वाघमारे, तालुका युवा उपाध्यक्ष विजय कांबळे विद्यार्थी आघाडी तालुका महासचिव रामेश्वर कांबळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे

रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा युवा निरीक्षक मा. अनिल शिरसे साहेब, रिपब्लिकन सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष  गौतम गावंडे, रिपब्लिकन सेनेचे तालुका महासचिव कपिल भेदेकर , यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी दिलीप भद्रे, मारुती कांबळे ग्रामपंचायत सदस्य कारला (बु), राहुल जिगळेकर, भैय्यासाहेब लोकडे आदींची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments