Header Ads Widget

बिहार मध्ये नालंदा जिल्ह्यात लग्नाच्या तासांतच वधू-वराचा अपघातात मृत्यू - दोन्ही परिवारावर आनंदाच्या क्षणात दुःखाचा डोंगर !!


नायगाव फास्ट न्यूज थेट - पाटणा - नेटवर्क - 

बिहार मधील नालंदा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना घडली
असून लग्न झाल्याच्या काही तासा नंतर नव वधू-वराचा एकत्रित पणे मृत्यू झाला असल्याच्या घटना नालिंदा जिल्ह्यात घडली असल्यामुळे दोन्ही परिवारावर आनंदाच्या क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला असून या क्षणार्धात दोन कुटुंबांच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले आहे

लग्न विवाह संपल्याच्या नंतर वधू आणि वराला घेऊन जात असलेल्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली असल्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली गेली व यात वधू-वर जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना नालिंदा जिल्यात घडली आहे 

 या अपघातात वधू वर ठार झाले तर वराचा मेहुणा गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते सदरील घटने प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रॅक्टरसह फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पथक पाचारण करून शोध घेण्यास सुरूवात केली ही घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका गावातील आहे 
 
बिहार राज्याच्या नालंदातील गिरियाक पोलीस स्टेशन हद्दीतील पुरानी गावाजवळ घडली असून दिनांक ५ मे २०२३ शुक्रवारी गिरियाकच्या सतुआ गावातील कारू चौधरी यांची मुलगी पुष्पा कुमारी वीस वर्षे हिचा विवाह नवाडा येथील महाराणा गावातील रहिवासी श्याम कुमार २७ वर्षे याच्याशी विवाह झाला होता

दिनांक ६ मे २०२३ शनिवारी दुपारी पुष्पा यांना निरोप देण्यात आला इनोव्हा कारमधून श्याम आपली नववधू पुष्पा आणि मेहुणीसह महाराणा गावाकडे निघाले होते 

सदरची कार पुरैनी गावाजवळ आली असता भरधाव वेगात असलेल्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने कारला उडविले आहे 

Post a Comment

0 Comments