Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गंगाधर पाटील चाभरेकर यांचा तेलंगणाच्या केसीआर मध्ये प्रवेश ?


हिमायतनगर
:
नागोराव शिंदे ----

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे हदगाव हिमायतनगर विधानसभेचे नेते गंगाधर पाटील चाबरेकर यांचा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या केसीआर पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसून येत आहे 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेड जिल्ह्यात हळूहळू त्यांच्या पक्षाला बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळी सह कार्यकर्त्यांना राजकीय पुढार्‍यांना पक्षात प्रवेश देत असल्याने सदरचे नेते मंडळी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत जास्तीचा संपर्क वाढत असल्याने कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी नांदेड जिल्ह्यातील नामांकित राजकीय पुढारी केसीआर पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे

विद्यमान गंगाधर पाटील चाभरेकर प्रथम काँग्रेस पक्षात असताना अयोग्य सभापती झाले होते परंतु तत्कालीन आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्षात केला होता आता हदगांव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान नेते गंगाधरराव पाटील चाभरेकर यांनी स्वतःच्या पक्षाला व घराला हुलकावणी देऊन केसीआर मध्ये प्रवेश केला असल्याचे चर्चेला उधाण आले आहे 

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चाभरेकर यांनी पक्षात प्रवेश केला का ? की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते असा ही प्रश्न चर्चेला जात असला तरी तेलंगणाचे जाळे हळूहळू महाराष्ट्रात पसरत असल्याने तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यात समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे ही चर्चा ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे 

माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गंगाधर पाटील चाभरेकर यांनी तेलंगणाच्या केसी आर मध्ये प्रवेश  ?  केला आहे 

Post a Comment

0 Comments