Header Ads Widget

धर्माबाद ते नांदेड मुखेड ते भोकर रुई मार्गे तात्काळ बस सेवा चालू करा - अन्यथा आंदोलन छेडू निलेश देशमुख यांचा राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याना इशारा -

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील व घुंगराळ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे रुई बु मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस चालू नसल्यामुळे या मार्गावरील जनसामान्यासह जनतेची मोठी हेळसांड होत असून त्यासाठी धर्माबाद ते नांदेड मुखेड ते भोकर रुई मार्गे तात्काळ बस सेवा चालू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख रुईकर यांनी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याना इशारा दिला आहे 
नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा अधिकाऱ्यांना लेटर पॅड वर सदरची बस चालू करण्यासाठी मागणी करण्यात आली होती परंतु या मागणीला केवळ अधिकाऱ्यानी रस्त्याची अडचण दाखवित आहेत या मार्गावर बस चालू होत नसल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येत असून अधिकाऱ्यानी यांची नोंद घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहेतालुक्यातील रुई बु मार्गे गेल्या अनेक वर्षाखाली म्हणजे सन १९८४ ते १९८५ साली बडापाड ते भोकर बस सेवा सुरळीत चालू होती त्यानंतर औराद ते भोकर बस चालू होती आणि १९९७ ते ९८ सालाच्या दरम्यान धर्माबाद ते नांदेड बस व्यवस्थित चालू होती त्याच बरोबर नरसी ते उमरी बस सुरळीत चालू असताना सुद्धा अधिकाऱ्यानी अचानक पणे बस बंद केली असल्यामुळे या संदर्भात बस सेवा चालू करण्यात यावे म्हणून वेळोवेळी सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या सामाजिक कार्यकर्ते खंडू मोहनाजी वाघमारे यांनी पाठपुरावा करत आहेत 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यानी धर्माबाद ते नांदेड मुखेड ते भोकर रुई मार्गे तात्काळ बस सेवा चालू नाही केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांचा राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यानाच इशारा दिला आहे 

Post a Comment

0 Comments