हिमायतनगर नागोराव शिंदे
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शुभ हस्ते हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे सन्मानात उद्घाटन करण्यात आले सदरच्या दवाखान्यात तमाम रुग्णांसाठी दर्जेदार सेवा २४ तास दिले जाणार असल्याचे आमदार जवळगावकर यांनी सांगितले आहे आहे
हदगांव व हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला यावेळी सदरील दवाखान्यातील कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ.संदेश पोहरे तालुका आरोग्य अधिकारी हिमायतनगर यांच्या हस्ते आमदार जवळगावकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे दवाखान्यात येणारऱ्या रुग्णासाठी व जनतेसाठी वैद्यकीय अधिकारी असं सर्व कर्मचाऱ्यांनी २४ तास सेवा देऊन रुग्णासाठी मोठी कामगिरी करणार असल्याचे ही सदरच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे
या दवाखान्यात रुग्णाला औषध पाणी उपचाराबरोबर त्यांच्या आरोग्याच्या चांगल्या प्रकारे काळजी घेऊ अशी ही वैद्यकीय अधिकारी यांनी नायगाव फास्ट न्यूज हिमायतनगरचे विशेष तालुका प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले आहे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
विशेष सूत्रसंचालनव आभार प्रदर्शन अफरोज सौदागर यांनी केले यावेळी डॉ.वैभव नखाते, डॉ. अनील पोपूलवार, आरोग्य सहाय्यक श्री.राजू नागमवाड, आशा समन्वयक श्री. कृष्णा चौधरी, श्री.सचिन देशमूख, श्री.सूनील चव्हाण, श्री.सूरेश बादेवाड, डॉ.सूवर्णा परभनकर आदी यावेळी उपस्थित होते
कू.प्रतिक्षा घोरबंड, श्रीमती वर्षा मेटकर, डॉ.किरण भाले, डॉ.बालाजी मिजगर, डॉ.गोविंद वानखेडे, पळसपुरकर डॉ.प्रेम वाघमारे, श्री. साईनाथ नारखेडे,श्री.शाम अनरवाड, व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते

0 Comments