Header Ads Widget

देवानंद गुंडेकर यांची रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या शहरअध्यक्ष पदी निवड


       
     

माधव पवार /
नागोराव शिंदे :-:


संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेली संघटना म्हणजेच रुग्ण हक्क संरक्षण समिती होय. रुग्णांची होणारी हेळसांड व त्यांना वेळेवर न मिळणारी  रुग्णसेवा तसेच रुग्णांना सेवेसाठी सर्वोतोपरी कार्य करणे हे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे कार्य करीत असते रुग्ण आणि रुग्णवाहिका यांच्यात असलेले जीवा पलाडचे प्रेम हे टिकून राहण्यासाठी देवानंद गुंडेकर यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे 

या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या हिमायतनगर तालुका शहर अध्यक्ष पदी देवानंद नामदेवराव गुंडेकर यांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
    
देवानंद गुंडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात  कार्यरत असल्यामुळे व  हिमायतनगर तालुक्यात  सामाजिक क्षेत्रा बरोबर आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना त्यांच्या कार्याची दखल घेत रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा निलेश करमुडी यांच्या अध्यक्षतेखाली 
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनुमंत गोत्राळ, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली
देवानंद गुंडेकर यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे 

नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार मोरे तथा भोकर तालुकाअध्यक्ष गंगाधर नक्कलवाड यांच्या सहकार्याने देवानंद गुंडेकर यांची हिमायतनगर तालुका शहरअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

देवानंद गुंडेकर यांच्या निवडी बद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विजय वाठोरे  सरसमकर महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक गंगाधर गायकवाड लोकस्वराज्य आंदोलन चे तालुका अध्यक्ष धोंडोपंत बनसोडे पत्रकार प्रशांत राहुलवाड राजे प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे पत्रकार राम चिंतलवार सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत 

तालुक्यातील विविध क्षेत्रातील मित्रमंडळी व कार्यकर्ते व जिल्हासह तालुका स्तरावरून त्यांच्या निवडीचे अभिनंदन व कौतुक करून शुभेच्छाच्या वर्षाव करीत आहेत 

 

Post a Comment

0 Comments