Header Ads Widget

शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजेत माजी आ.वसंतराव चव्हाण - नायगाव कृउबास च्या सभापतीपदी श्रीनिवास पा.चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपचे शिवराज पा. होटाळकरांची वर्णी !!


नरसी : दिलीप वाघमारे :--
:

राजकारण म्हणजे  सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठेतरी तडजोड करावी लागते.परंतु काही लोकांच्या मनात नायगाव मार्केट कमिटीची निवडणूक व्हावी असा हेतू होता.मात्र ९० इच्छुकांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपली उमेदवारी माघार घेतली असून माझ्या कार्यकाळात १ कोटी खर्च करून वेअर हाऊस निर्मिती केली आहे 
तसेच मांजरम येथे पेट्रोल पंपाची उभारणी केली. त्यामुळे आगामी काळात सभापती व उपसभापती यांनी बाजार समितीची उत्तरोत्तर प्रगती व सामान्य शेतकऱ्यांना मार्केट कमिटीच्या मध्यामातून न्याय मिळाला पाहिजेत तसेच गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी मंगलकार्य सभागृहसाठी प्रयत्न कराव्यात असा अशावाद माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला.दरम्यान नायगाव कृषी उत्पादन बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती व उपसभापती निवड प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगांवकर, दिलीप धर्माधिकारी, मनोज मोरे,श्रीनिवास पा. चव्हाण,शिवराज पा होटाळकर,संजय बेळगे,श्रावण भिलवंडे, पक्ष निरीक्षक आनंद चव्हाण,माधवराव बेळगे,विजय चव्हाण,प्रा.रवींद्र चव्हाण,सय्यद रहीमसेठ,प्रा.मनोहर पवार,हणमंतराव चव्हाण,रमेश शिंदे आदी उपस्थित होते 

यावेळी श्रीधर पा चव्हाण, दत्तामामा येवते,राहूल नखाते,शिवाजी पा. होटाळकर,पांडू चव्हाण,माणिक चव्हाण, गणेश पा गोळगांवकर,बालाजीराव मद्धेवाड,बालाजी शिंदे,दत्ता पा. इज्जतगांवकर,विनायक पा शिंदे,सह नुतन संचालक माधवराव बेळगे,कदम हणमंत दत्ता,बापूराव पाटील,पवार नारायण देवराव,पुयड व्यंकटराव,लक्ष्मण देगलूरे,पाटील गणपतराव वसंतराव,अबदागोरे विश्वनाथ,भेलोंडे यादवराव,सोडारे केरबा,साखरे विश्वनाथ प्रभ,आरगुलवार नरेश उद्धव,जावदवार श्रीनिवास व्यंकटराव,भालेराव पंढरी बाबुराव यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष समारोप करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणाले मार्केट कमिटी सक्षम काऱ्याची असेलतर स्थानिक आडदच्या व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या,काही मार्केट कमिटी माघे कां येत आहेत.

सोयाबीन किंवा हळद,हरभरा या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव पाच हजार असलं तर सहा हजार रुपयांनी खरेदी करून पैसे वर्षभरात दयाचे नाही म्हणून काही मार्केट कमिटी माघे येत असून नायगांवकरांनी अनेकांना मोठे केले.हे मी अनेकदा पाहिले आहे

खा.प्रताप पा चिखलीकर यांनी सहमती दिल्यामुळे शिवराज पाटील होटाळकर हे आज उपसभापती झाले आणि कुठल्याही पक्षाचे असो ही जोडी निश्चितच मार्केट कमिटीचे वैभव वाढविणार असा आशावाद देखील व्यंकटराव पा. गोजेगांवकरांनी व्यक्त केला.तर सुरेख सूत्रसंचालन दत्तामामा येवती यांनी केले तर आभार संजय बेळगे यांनी मानले.
         
शेतकऱ्यांच्या अन् व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करणार*
 उपसभापती होटाळकर - 

नांदेड जिल्ह्यात अनेक मार्केट कमिटी मध्ये आवक मोठ्या प्रमाणात आहे.त्यांचं धर्तीवर येथील मार्केट कमिटी व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी योग्य निर्णय घेऊन शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या हितासाठी यापूर्वी मी संचालक म्हणून गेल्या सहा वर्षांपासून कामे केले असून माझ्या पक्षातील ३७ लोकांनी बिनशर्त माघार घेतल्याने मी आज उपसभापती झालो त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करून आगामी काळात नरसी आणि मांजरम उपबाजार पेठ सुरू करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे मत नुतन उपसभापती शिवराज पाटील होटाळकरांनी व्यक्त केले.
           ""
कृउबास च्या सभापती अन् उपसभापतीचा पत्रकारकडून सन्मान - 

नायगाव तालुक्यातील जिगरबाज लोकप्रतिनिधी श्रीनिवास पाटील चव्हाण अन् शिवराज पाटील होटाळकर यांची नायगाव मार्केट कमिटीच्या सभापती आणि उपसभापती बिनविरोध निवड झाल्याबद्दल नायगाव मराठी पत्रकार संघाकडून त्यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments