नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर अभिजित राऊत यांना चांगलाच दणका सरपंच व सदस्याना दिला असून राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना जातं वैद्यता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी दोन वेळा सांगितले होते परंतु सदरच्या सदस्यांनी दाखल केले नसल्याचा ठपका लावून अपात्रेतेची कारवाई केल्यामुळे संबंधित सरपंच व सदस्याचे चांगले ढाबे दणावले आहे
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तालुक्यातील ११२ ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन वेळा मुदत दिली होती त्या मुदतीला या लोकाकडून केराची टोपली दाखविण्यात अल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक लढविली होती
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या शासकीय दरबारात नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच व सदस्य अपात्रतेच्या कारवाईत अडकले असल्यामुळे पोपटाचा पिंजरा रिकामाच राहणार की काय असा प्रश्न जनतेतून चर्चेला जात आहे
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन वेळा मुदत दिल्या नंतर सुद्धा तालुक्यातील ११२ ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्यांनी सादर केले नाही त्यामुळे या सदस्यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिनांक १८ मे २०२३ रोजी आदेश दिला आहे
अपात्र ठरलेल्या ग्रामपंचायतच्या आठ ते दहा सरपंचाचा समावेश असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असली तरी नांदेडचे कलेक्टर अभिजित राऊत सदरचा निर्णय घेतला नायगाव तालुक्यात २०२१ मध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या या निवडणुकी मध्ये मोठया प्रमाणावर राखीव उमेदवार उमेदवार निवडून आले होते मात्र राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्बंधामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकले नव्हते असे सांगण्यात येते आहे
त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांनी जात पडताळणी समितीकडून दिलेली जातीचे वैद्यता प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांना सादर करण्यासाठी पहिल्यांदा १७ जानेवारी २०2२ व नंतर,१७ जानेवारी २०२३ रोजी अशी मुदत दिली होती
त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५७ चे कलम १० ( १ अ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगा कडील परिपत्रक क्रमांक रानिजा २०१२ प्र क्र १०/ का ५ दिनांक ७ नोव्हेंबर २०१९ नुसार संदर्भ क्र २ अन्वे प्रदान अधिकाराचा वापर करण्यात आला आहे
तालुक्यातील ११२ सरपंच आणि सदस्यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी त्यांची निवड प्रभावाने रद्द करून पुढील कारवाई साठी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य म्हणून राहता येणार नाही असे ठरविण्यात आले आहे

0 Comments