नायगाव तालुक्यातील मौजे मनूर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत नायागांव नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गटाचे व शिव शंकर शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख गुणांची पाटील शिंदे यांच्यासह प्रल्हाद पाटील शिंदे किशनराव दिंगाबरराव पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे पॅनल उभे केले या निवडणुकीत १२ उमेदवार मोठया बहुमताने विजयी झाले तर एक ओ बी सी उमेदवाराची जागा रिक्त आहेतालुक्यातील मौजे मनूर ( त.ब ) सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक मोठी अटीतटीच्या होऊन सेवा निवृत्त शिक्षक रावसाहेब शिंदे यांचा गटाचा पराभव झाला या ठिकाणी दोन शिंदे गटातच सदरची निवडणूक पार पडली असली तरी सेवा निवृत्त मुख्याध्यापक जि एम शिंदे यांच्या गटाचा दणदणीत विजय झाला या एकूण १२ उमेदवार विजयी झाले आहेतमनूर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीतील
विजयी उमेदवार गुणाजी भाऊराव पाटील शिंदे,सेवा निवृत्त मुख्याध्यापक गोविंद महाजनराव शिंदे, गोपीनाथ पुंडकीक पाटील शिंदे, महोन मारोती पाटील शिंदे, रामचंद्र आनंदा पाटील शिंदे लक्ष्मण दत्तराम पाटील शिंदे, संभाजी ग्यानोबा पाटील शिंदे, दिंगाबर प्रेमजी सर्जे, सौ पार्वर्तीबाई प्रल्हाद पाटील शिंदे, सौ राधाबाई किशनराव शिंदे, मारोती शेषराव हांडेवार, दिंगाबर अंसाजी वाघमारे हे विजयी झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे
सेवा सहकारी सोसायटी मनूरच्या चेअरमन पदासाठी सर्वानुमते सेवा निवृत्त मुख्याध्यापक जि.एम. शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे

0 Comments