Header Ads Widget

घुंगराळा येथे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात लढत - दोन्ही पॅनल प्रमुखाचे बॅनर झळकले !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात अटीतटीची निवडणूक होत असल्यामुळे या निवडणुकीकडे अख्या नायागांव तालुक्याचे लक्ष लागले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे हे श्री म्हाळसांकात सहकार विकास पॅनलचे पार्टी प्रमुख आहेत तर काँग्रेस पक्षाचे साहेबराव माधवराव माली पाटील सुगावे हे श्री जय मल्हार सहकार विकास पॅनलचे पार्टी प्रमुख आहेततालुक्यातील मौजे घुंगराळा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात होत असल्यामुळे सदरच्या निवडणुकीला चांगलाच रंग येताना दिसून येत आहे

काँग्रेस पक्षाचे साहेबराव माली पाटील सुगावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत पाटील सुगावे या दोन्ही नेतृत्वाखाली सदरची निवडणूक लढविण्यात येत असली तरी श्री म्हाळसांकात सहकार विकास पॅनलची निशाणी कप बशी तर साहेव पाटील सुगावे यांच्या पॅनलची निशाणी छत्री असून सदरची सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दोन सुगावे गटात होत आहे 






Post a Comment

0 Comments