माधव पवार
देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी या देशातील एक हजार रुपयाची नोट व पाचशे रुपयाचे चलन बंद करून परत देशामध्ये दोन हजार रुपयांची नोट चेलानात आणली परंतु सध्याच्या परिस्थितीत पाहिले तर ग्रामीण भागात दोन हजार रुपयांची नोट दिसत नसल्यामुळे सदरची नोट गेली कुणीकडे ? असा प्रश्न तमाम जनतेतून चर्चेला जात आहे
सध्या चलनामध्ये पाचशे रुपयांची नोट दोनशे रुपयांची नोट शंभर रुपयांची नोट पन्नास रुपयांची नोट वीस रुपयांची नोट दहा रुपयांची नोट मोठ्या प्रमाणात चलनात दिसत असल्या तरी दोन हजार रुपयांच्या नोटासाठी नागरिकाला शोध घ्यावा लागत असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे
या देशात भाजप सरकार आल्यांच्या नंतर या देशाचे पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी साहेबांने स. न. दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता नोटबंदीचा आदेश जारी केला असून या नोटबंदी दरम्यान मोठी तारांबळ जनतेची उडाली असल्याचे वास्तव चित्र पाहवयास मिळाले होते
चलनातील १००० हजार रुपयांची नोट व पाचशे रुपयांची नोट बंद झाल्याच्या नंतर सदरच्या सरकारने बँकेत पैसे जमा करण्यासाठी सुद्धा आदेश जारी केला जनतेने सुद्धा त्यांच्याकडे असलेली पैसे बँकेला जमा केले आहे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण निर्णय जाहीर केले की रात्री १२ नंतर ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या जातील जमा करा लोकांच्या सोयीनुसार नोटा ही बँकेत जमा करण्यात आल्या परंतु भारतात दोन हजारांच्या नोटांची निर्मिती झाली आहे
परंतु ते नोटा सध्याच्या परिस्थिती मध्ये दोन हजार रुपयांची नोट सहजासहजी मिळत नसल्याने सदरच्या नोटा कोणाच्या घशात गेल्या की बंद झाल्या आहेत असा ही प्रश्न जनतेला भेडसावत आहे

0 Comments