नायगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अजब कारभारामुळे माजी मंत्री तथा खा. स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला लोखंडी खांब एका घरावर पडला आहे
विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी सदरचा खांब सरळ करण्यासाठी अथवा काढण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आल्याच्या नंतर माजी मंत्र्याचे सुपुत्र राजेश देशमुख कुंटूरकर यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती दिली असताना सुद्धा अधिकारी सदरचा खांब काढण्यासाठी चालढकल करत असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहेतालुक्यातील कुंटूर विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे रस्त्यावर असलेला लोखंडी खांब एका घरावर पडला असल्याने सदरच्या घर मालकाच्या कुटुंबीयाला धोक्याची घंटा असून सदरचा खांब कधी काढणार असा ही प्रश्न चर्चेला जात आहेकुंटूर नगरीचे सुपुत्र राजेश देशमुख कुंटूरकर यांनी परत एकदा विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला धारेवर धरावे अशी मागणी या भागातील लोकातून बोलल्या जात असले तरी रस्त्यावर असलल्या घरावर विद्युत तार पडला असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत केला असला तरी कधी सुरळीत करणार असा प्रश्न पडला आहे कुंटूर येथे लोखंडी खांब हा वादळी वाऱ्यामुळे एका घरावर पडला असल्याने कदाचित तशाच पद्धतीने वादळी वारे सुटले तर या लोखंडी खांबाच्या विद्युत तारामध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो असी भीती या गल्लीतील घर मालकासह नागरिकांना पडली आहे
सदरचा लोखंडी पोल विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व लायनमन गांभीर्याने लक्ष देऊन काढल्यास पुढील अनुचित प्रकार घडणार नाही यांची दक्षता अथवा खबरदारी अधिकाऱ्यांनी घेऊन तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरित आहे

0 Comments