नांदेडच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या व जबरी चोरी करणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात अडकला असून पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून सदरची घटना दिनांक १३ मे २०२३ रोजी सायंकाळी ९ वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे विमानतळ हद्दीतुन ऑटोतुन प्रवास यास दोन अज्ञात आरोपी कडून खुनाचा प्रयत्न करून जबरी चोरी केल्या घटना घडली होती
नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडवून आणलेल्या घटनेच्या प्रकरणातील ऑटो चालकांच्या फिर्यादी वरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा १६७ / २०२३ कलम ३०७,३९७,३४१, ३४ भा.दविसह ४/ २५ शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरील गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना अटक करण्याच्या संदर्भात नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक एलसीबी नांदेड यांना आदेशित केले होते
पोलीस अधीक्षकाच्या आदेशाचे पालन करून एलसीबीचे पोलीस निरीक्षक आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक नांदेड यांनी वेगवेगळे पथक तयार करून आरोपीचा शोध घेणे चालू केले होते या शोध मोहिमेत सदरच्या गुन्ह्यातील आरोपीला एल सी बी च्या पथकानी रंगेहात पकडून जेरबंद केले आहे
दिनांक १६ मे २०२३ रोजी एलसीबीच्या पथकास गोपनीय माहिती खात्रीशीर मिळाल्याने सदरचे पथक घटनास्थळी पोहचले सदरील गुन्ह्यातील आरोपी शेरू सुशांतसिंग परमार व त्यांचे दोन साथीदारांनी मिळून केलेल्या सदरचा प्रकारणातील आरोपी परमार हा महाराणा प्रताप चौकात थांबलेला असल्याची माहिती एलसीबीच्या मिळाली आहे
पोलीस अधीक्षक यांचा आदेश " अन " स्थागुशाची दमदार कारवाई ""
सदरील कारवाई दरम्यान आप्पर पोलीस अधिक्षक अबीनासकुमार आप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर सपोनि पांडुरंग माने पोउपनी दत्तात्रय काळे पोउपनी माधव केंद्रे महिला पोलीस नाईक किरण बावर चालक गंगाधर घुगे हेमंत बिचेवार यांनी सदरची दमदार कारवाई पार पाडली आहे
नांदेडच्या एलसीबी पथकाने सदरची माहिती आपल्या वरिष्ठांना देऊन एलसीबीच्या पथकाने महाराणा चौक नांदेड येथे सापळा रचूला आहे
त्या आरोपीचे नाव शेरू खुशाल सिंह परमार वय ४२ वर्षे व्यवसाय ऑटो चालक राहणार सखुजी नगर नांदेड यास ताब्यात घेऊन त्या गुन्ह्याबाबत एल सी बीने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांनी व त्यांचे दोन साथीदार सतीश उर्फ सत्या हनुमंत चव्हाण राहणार बालाजी नगर कृष्णा चौक नांदेड आकाश उर्फ रितेश प्रकाश खिलारे राहणार तानाजी नगर नांदेड यांनी मिळून केला असल्याचे सांगितले आहे
सदरच्या आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेला एक ऑटो व एक मोबाईल असा एकूण दोन लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाजप्त करण्यात आला असून सदरच्या आरोपीस पोलीस स्टेशन विमानतळ येथे पुढील तपास कामी देण्यात आले असले तरी त्यांच्या कडून आदिकचे गुन्हे उघड केस येण्याची शक्यता आहे

0 Comments