Header Ads Widget

नायागांवासह घुंगराळ्याच्या रस पोळीची जिल्ह्यात चर्चा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे तर कुंटूर कृ. ऊ बा स.उपसभापती मनोज पाटील मोरे, मा.बालाजी बच्चेवार यांच्या वाढदिवसाला अफाट गर्दी !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघातील तीन नामांकित राजकीय पुढाऱ्याचा वाढदिवस मोठया थाटात बॅनर बाजी करून रसपोळीचे आयोजन केले होते काँग्रेस पक्षाचे कुंटूर मार्केट कमीटीचे उपसभापती मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव येथील जय राज पॅलेस येथे रस पोळीचे आयोजन व नियोजन टाकळीकर परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहेजिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांचा वाढदिवस दिनांक २८ मे २०२३ रोजी वाढदिवस मोठया थाटात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसपोळीचे आयोजन सुगावे परिवाराच्या वतीने करण्यात आले आपल्या राजकीय पुढाऱ्याच्या वाढदिवसाला त्यांच्या राजकीय वर्तुळातील दिग्ज नेते मंडळी आशीर्वाद देण्यासाठी अर्वजून उपस्थित होते

नायगाव येथील भाजपा पक्षाचे बरबडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांचा ही वाढदिवस मोठया थाटात संपन्न झाला असल्यामुळे या तिन्ही राजकीय पुढाऱ्याना शुभेच्छाचा वर्षाव करण्यासाठी जिल्ह्यातील दिग्ज नेते मंडळी उपस्थित होते

परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अतिशय स्वाधिष्ठ रस पोळीचे आयोजन करण्यात आले त्यांचा आस्वाद मतदार संघातील बांधवानी घेतला आहे 

नायागांवासह घुंगराळ्याच्या रस पोळीची जिल्ह्यात चर्चा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे तर कुंटूर कृ. ऊ बा स.उपसभापती मनोज पाटील मोरे मा. बालाजी बच्चेवार यांच्या वाढदिवसाला नेते मंडळीसह चाहत्याची व मतदार राजाची अफाट गर्दी उसळली होती हे वास्तव चित्र नायगाव तालुक्यात दिसून आले आहे

Post a Comment

0 Comments