Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीचे उपसभापती मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या रसपोळीच्या मेजवानीची ठासून चर्चा !!

     
       
        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमीटीचे विद्यमान उपसभापती यांची निवड झाल्याच्या नंतर नायगाव येथील जयराज पॅलेस मध्ये भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून रस पोळीच्या मेजवानीचे सर्वत्र निमंत्रण देण्यात आला या मागचा उद्देश जरी कोणता नसला तरी एवढे मोठे शक्ती करण्या मागचे कारण काय होते असा जरी प्रश्न केला जात आहे

कुंटूर मार्केट कमिटीचे उपसभापती मनोज पाटील मोरे टाकळीकर यांनी दिलेल्या रस पोळीच्या मेजवानीच्या माध्यमातून निश्चित आघामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा विषय समोर येतोच तसे नसले तरी नुकतेच मार्केट कमिटीचे उपसभापती पदावर विराजमान झाल्यामुळे रस पोळीची मेजवानी दिली का असा ही प्रश्न चर्चेला जात असून रस पोळीच्या कार्यक्रमासाठी नेते मंडळीसह जनतेचं शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचे दिसून आले आहे

तालुक्यातील कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती मनोज रावसाहेब पाटील टाकळीकर यांनी नायगाव येथे स्नेह भोजनाचे उत्तम आयोजन केले होते याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सहभागी झाले होते उपसभापती मनोज पाटील मोरे यांची उपसभापती पदी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा ही देण्यात आल्या असल्या तरी दिलेल्या रस पोळीच्या मेजवानीची जिल्ह्यासह तालुक्यात ठासून चर्चा मात्र होताना ऐकावयास मिळत आहे 

यावेळी नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण,माजी आमदार अमरभाऊ राजूरकर,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा,हणमंतराव पाटील चव्हाण माधवराव बेळगे नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती श्रीनिवास पाटील चव्हाण बालाजी मद्देवाड मनोहर पवार संभाजी पाटील भिलवंडे आदी उपस्थित होते 

 यावेळी श्रीधर पाटील चव्हाण बापूसाहेब पाटील कौडगावकर शिवाजी पाटील जाधव भगवान पाटील श्रीकांत पाटील चव्हाण लक्ष्मण पाटील हास्सेकर जयराज मोरे आदी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments