नांदेडच्या लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता आडवित दगड फेक करीत जब्बरी चोरी करणाऱ्या चार आरोपी चोरट्याला लिंबगाव पोलीसांनी अवघ्या दोन तासात सपोनि चंद्रकांत पवार यांच्या पोलीस टीमने रंगेहात पकडून जेरबंद केले या प्रकारणात गावकऱ्यानी ही पोलिसाना सहकार्य केल्याचे सांगण्यात येत असून सदरील घटना दिनांक २८ मे २०२३ रोजी पहाटे एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे
शहारातील चैतन्य भागातील सुमय्या कॉलनीतील रहिवासी असलेले व्यापारी सय्यद बिलाल सय्यद सलीम हे आपल्या कुटुंबासह करच्या सहाय्याने वसमत कडे जात असताना भालकी पाटी जवळ पहाटे दीड ते पावणे दोनच्या सुमारास दबा धरून वाट मारी करण्याच्या तयारीत आरोपी गणेश आनंदा कांबळे वय २५ वर्ष राहणार ओंकारेश्वर नगर जैन मंदिर जवळ नांदेड शुभम बाबाराव गंगातिरे वय २२ राहणार भालकी मुन्ना प्रताप संतोष पांचाळ वय १९ वर्ष राहणार भालकी यांनी व्यापाऱ्याची गाडी अडवून जब्बरी चोरी केले आहे
लिबंगाव पोलिसांनी चारही आरोपीला जेरबंद केले सदरील प्रकरणातील फिर्यादी सय्यद बिलाल यांच्या फिर्यादी वरून चार आरोपीच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनास कुमार नांदेडच्या गर्मीन उपयोगाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी लिंबगाव पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पवार आणि त्यांच्या पोलीस टीमचे अभिनंदन केले आहे

0 Comments