नागपूर जिल्ह्यातील चांपा उच्च प्राथमिक शाळेतील विध्यार्थीच्या शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा पूर्व तयारीचे आयोजन केले होते सदरचे आयोजन दिनांक २ मे २०२३ रोजी करण्यात आल्याची माहिती असून उच्च प्राथमिक शाळा चांपा पंचायत समिती उमरेड येथे शाळा पूर्वतयारी कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे
राज्यातील शिक्षण क्षेत्र सक्षम झाले पाहिजे हे सर्वांची अपेक्षा असतें त्यानुसार सदरच्या कार्यक्रमाला प्रशासन प्रधान्य देत असून विध्यार्थीना सध्याच्या परिस्थितीत दर्जेदार शिक्षणाची गरज असल्यामुळे शासकीय यंत्रणा लक्ष दिले असल्याचे सांगण्यात येते देशाला व राज्यातील शिक्षण क्षेत्र भक्कम झाले पाहिले व विध्यार्थी हे शिक्षणाच्या माध्यमातून देशाचे भवितव्य आहे
जिल्ह्यातील चांपा उच्च प्रथमिक शाळात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती रोशनी ताई गुप्ता यांच्यासह गावचे सरपंच अतिश जी पवार यांची प्रामुख्याने उपस्थित होती तसेच दाखल पात्र विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते
सदरील कार्यक्रमाला वामन भोयर ,मीताराम भोसले,मुख्याध्यापक प्रकाश चौधरी, विजय शेटे चंदा गायकवाड, तसेच कुमारी सारिका वेलके उपस्थित होते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली कार्यक्रमाला गावातील जेष्ठ प्रतिष्ठीत मंडळी व पालक आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

0 Comments