Header Ads Widget

राजस्थानमध्ये लष्कराचे विमान शेतातील घरावर घरातील कोसळले २ ठार झाल्याची भीती

नायागांव फास्ट न्यूज : नेटवर्क राजस्थान :- 

राजस्थानच्या हनुमानगडमध्ये लष्कराचे विमान कोसळले असून मिग-२१अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून सदरच्या हवाई दलाकडून याबाबत कोणती ही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी लष्कराच्या विमानाला अपघात झाला आहे 

प्राथमिक माहिती नुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्या नंतर पायलटने ते शेतात कोसळण्याचा प्रयत्न केला जे शेतातच बांधलेल्या घरावर पडले असल्याचे सांगण्यात येत आहे 
 
लष्कराच्या विमानातील दोन्ही वैमानिक वेळीच पॅराशूटच्या मदतीने उतरण्याचा यशस्वी प्रयत्न केला मात्र घरात उपस्थित असलेल्या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे पुढील तपास सुरू अडून राजस्थानचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असल्याचे सांगण्यात येते

वृत्तसंस्था एएनआयने भारतीय वायुसेनेच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान राजस्थानमधील हनुमानगढजवळ कोसळले. सुरतगड येथून विमानाने उड्डाण केले होते पायलट सुरक्षित आहे.

भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान दिनांक ८ मे २०२३ रोजी सकाळी राजस्थानमधील हनुमानगडजवळ कोसळले सुरतगड येथून विमानाने उड्डाण केले होते वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी मारून आपला जीव वाचवला आहे

विमान एका घरावर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते परंतु मृत्यूचा आकडा वाढण्या ची शक्यता ? आहे 

एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पायलटला एअरलिफ्ट करण्यात आले वैमानिकासाठी हवाई दलाचे एमआय- १७ पाठवण्यात आले अशी माहिती स्थानिक पोलिसां कडून सांगण्यात येते 

 
 
 
      

Post a Comment

0 Comments