नायगाव तालुक्यातील रुई बु येथील गावच्या हितासाठी व गावकऱ्याना मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने जल जीवन मिशीन अंतर्गत अंदाजे १ कोठी ३४ लाख रुपयाच्या कामाचे उदघाट्न आमदार राजेश पवार व राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते गेल्या दोन ते आडीच महिन्याखाली ग्रामपंचायत कार्यलयाचे वतीने करण्यात आले त्या कामाच्या पाणी पुरवठ्याचे विहिरीच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहेतालुक्यातील रुई बु ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ प्रिंयका निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते गावाला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गावचे ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व सदस्य प्रयत्नशील असल्यामुळे सदरच्या पाणी पुरवठा विहिरीचे अंदाजे एका महिन्यात पूर्ण होईल असी अपेक्षा ग्रामपंचायतने केली आहे
ग्रामपंचायत कार्यलय रुई बु येथील जल जीवन मिशीन अंतर्गत करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामाला गुत्तेदार यांनी कामाची गती वाढवून शक्यतो लवकर काम पूर्ण करतील अशी अपेक्षा ही सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख व गावचे ग्रामसेवक सूर्यवंशी यांनी व्यक्त केली असून सध्याच्या परिस्थितीत पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे काम जलद गतीने चालू करण्यात आले असून सदरच्या विहिरीचे खोदकामं काही दिवसात होणार आहे
रुई येथे जल जीवन मशीन अंतर्गत होत असलेले काम ग्रामीण पाणी पुराठा जिल्हा परिषद नायगावच्या अधिकाऱ्यानी सुद्धा जास्तीचे लक्ष घालून होत असलेल्या कामाचे बिले लवकर लवकर दिले तर गुत्तेदाराना काम करण्यासाठी कठीण जाणर नाही यांची काळजी घेणे गरजेचे आहे

0 Comments