Header Ads Widget

नायगावच्या जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत निकालाची परंपरा कायम विध्यार्थीच्या यशा बदल कौतुक !!

        माधव पवार 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे

महाविद्यालयाचे एकूण ७३४ विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते त्यापैकी १४१ विद्यार्थी विशेष प्रविण्यसह उत्तीर्ण झाले तर ३७६ विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले एकूण ७३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ६९१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा निकाल  ९४.५२ टक्के असा लागला आहे

महाविद्यालयातील विज्ञान विभागात एकूण ४९८ विद्यार्थ्यांपैकी ४९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९८.९९ टक्के कला शाखेत १८२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सरासरी निकाल ८१.३१ टक्के एवढा लागला आहे 

वाणिज्य विभागातून एकूण विद्यार्थी ५१ परीक्षेत बसलेले होते त्यापैकी ५० विद्यार्थी पास झाले असून सरासरी निकाल ९८.०३ टक्के एवढा लागला तर एच. एस. व्ही. सी. विभागातून ४४ विद्यार्थ्यापैकी ३९ विद्यार्थी पास झाले असून विभागाचा निकाल ८८.६३ टक्के एवढा लागलेला आहे.

विज्ञान विभागातून प्रथम वडजे प्रसाद गुलाब  ९०.३३ टक्के द्वितीय कु. नरोड साक्षी गणेश ८६.८३ टक्के तृतीय  कु.शिंदे ऋतुजा व्यंकटी ८६.३३ टक्के .गुण मिळाले आहे 

कला विभागातून प्रथम चौधरी योगेश बालाजी ८८.८३ द्वितीय कु. बेंद्रीकर स्नेहा सुभाष ८४.५० टक्के तृतीय कु. हिवराळे धनश्री सुरेश ८२% गुण प्राप्त झाले वाणिज्य विभागातून प्रथम ईबितवार पियुष हनुमंत ८५.३३ टक्के   द्वितीय येलकेवाड महेश यादव ८२.६७ टक्के तृतीय क्रमांक कु. मोटरगे लोकेश्री गणपत ८१.३३ टक्के यांनी पटकावला आहे

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन एज्युकेशन सोसायटी नायगाव चे अध्यक्ष मा.आ. वसंतराव पाटील चव्हाण, सचिव प्रा.रवींद्र पाटील चव्हाण, संस्थेचे ज्येष्ठ संचालक केशवराव पाटील चव्हाण ,जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  के.जी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.प्रभाकर पवार, पर्यवेक्षक प्रा. गणेश देवडे पर्यवेक्षिका प्रा. सौ. शोभा शिंदे यांनी केले.



Post a Comment

0 Comments