मरण हे प्रत्येकाला आहे वडील गेल्या नंतर ही स्वताला सावरत त्यांच्या वंशाच्या दिव्याने अकराव्या पुण्यसमरण दिनी रुग्णवाहिका लोकार्पण करणे म्हणजे कमी वयात गजानन काशेटवार यांनी केलेला समाजाप्रति उदार कळवळा होय.काशेटवार परिवार यांचे औदार्य म्हणजे वडीलाच्या निधना नंतर त्यांच्या आईने केलेल्या सुसंस्काराचे फलित आहे
रस्त्याच्या अपघातात वडील गेल्या नंतर इतरांना तसा प्रसंग येऊ नये या साठी ग्रामीण भागातील वैश्य समाजातील गजानन काशेटवार यां तरुणाचे कार्य वैश्य समाजा सह इतरांनी आदर्श घ्यावे असे आहे.सदरच्या या कार्याने समाजा पुढे कलयुगात सेवा भाव कसा करावा याचा उत्कृष्ट नमुना त्यानी निर्माण केलाआहे असे प्रतिपादन ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांनी केले.
नायगाव तालुक्यातील कहाळा (खुर्द) येथील कै. ज्ञानेश्वर अनंतराव काशेटवार यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त काशेटवार परिवाराच्या वतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आणि जागर कीर्तनाचा कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य समाधान महाराज शर्मा केजकर यांचे दिनांक २४:मे रोजी बुधवारी राञी संत बाळगीर महाराज हायस्कुल येथे भव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
कै.ज्ञानेश्वर काशेटवार यांचा अकरा वर्षांपूर्वी कहाळा खुर्द येथे रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. अपघातानंतर त्यांना लवकर रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला रुग्णवाहिका मिळाली नसल्याने रस्त्यावरील अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतोही बाब लक्षात घेऊन त्यांचे चिरंजीव गजानन काशेटवार यांनी रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना यापुढे रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध व्हावी. या दृष्टीकोनातून आपल्या वडिलांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त काशेटवार परिवाराच्या वतीने एका रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्याचा संकल्प केला आहे
कार्यक्रमास गुरुवर्य ह भ प नीळकंठ महाराज कहाळेकर हणमंत पा चव्हाण संजय बेळगे श्रीनिवास चव्हाण,बालाजी बचेवार,मनोहर पवार,मनोज मोरे,बालाजी मदेवाड,नरेंद्र येरावार,प्रभाकर कोटगीरे,बाबू सावकार आरगुलवार,नरु सा.आरगुलवार आदी उपस्थित होते
पवन गादेवार ,मनोज आरगुलवार,पत्रकार बाळासाहेब पांडे,एस एम मुदखेडकर,नागेश कल्याण,गजानन चौधरी,संदीप कांबळे,गंगाधर ढवळे,सूर्यकांत सुर्यतळ, बालाजी शेवाळे, यांच्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पुढारी, कार्यकर्ते, आर्य वैश्य समाजातील पदाधिकारी, समाज बांधव, पत्रकार,नातेवाईक, समस्त गावकरी मंडळी हे उपस्थितीत होते.या कार्यक्रमाचे संचलन हंबर्डे यांनी केले तर आभार गजानन काशेटवार यांनी मानले

0 Comments