Header Ads Widget

राजस्थान राज्यातुन हैद्राबादकडे मेंढ्या घेऊन जाणाऱ्या आयचरला फरशीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात ४ जण तर १६५ मेंढ्या ठार - ? -


हिंगोली / कळमनुरी नेटवर्क :-

राजस्थान राज्यातुन हैद्राबादकडे मेंढ्या घेऊन जाणाऱ्या आयचरला फारशीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात ४ जण तर १६५ मेंढ्या ठार ठार झाल्या असल्याची घटना दिनांक २५ मे २०२३ रोजी पहाटे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्याच्या कळंबनुरी तालुक्यातील मालेगाव रस्त्यावर घडली असल्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी रवाना झाले सदरील घटनेचा पंचनामा पोलिसांनी केल्याचे सांगण्यात येत आहे 

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या रस्त्यावर माळेगाव जवळ फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला राजस्थान राज्यातुन मेंढ्या घेऊन येणाऱ्या आयचची व ट्रकची समोरासमोर धडक लागून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याचे सांगण्यात येते तर एक जण तर गंभीर जखमी झाला तर यांचं आयचर शंभर ते दीडशे मेंढ्या मृत्यू पावल्या असल्याची धक्कादायक घटना घटना घडली    ही सदरची घटना कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे

सदरील घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यासह सपोनि रेखा शहारे व ठाण्याच्या पोलीस टीमने तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळावर जखमी असलेल्या जखमीला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले व मेंढ्या घेऊन जाणाऱ्या आयचरला क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले त्यापूर्वी या मार्गावरील वाहतूक संपूर्ण विस्कळीत झाली होती परंतु कळमनुरी पोलिसांनी सदरची वाहतूक सुरळीत केली आहे 

जिल्ह्याच्या कळमनुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या माळेगाव येथील विजय विलास हॉटेलच्या समोर फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला राजस्थान राज्यातून हैद्राबाद कडे मेंढ्या घेऊन येणारा आयचर क्रमांक एम एच ५५ एपी ३१११ क्रमांकाची जब्बर धडक बसली आहे

सदरच्या झालेल्या भीषण अपघातात आयचरच्या कॉबीन मध्ये बसलेल्या पाच जणां पैकी तीन  जण जागेवरच ठार झाले तर एकाचा नांदेडच्या उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे

एक गंभीर जखमी असल्यामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू असल्याचे सांगण्यात येते 

 

Post a Comment

0 Comments