महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील व नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कृष्णुर एमआयडीसी ही राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे या ठिकाणी मोठ मोठाले कारखानदार कारखाने थाटण्यासाठी व उद्योग करण्यासाठी मोठी पसंती दिली असली तरी औद्योगिक वसाहती मध्ये काळ्या कोट अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
नांदेड येथे उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सदरच्या एमआयडीसी कार्यक्षेत्रातील अडचणी व एमआयडीसी अंतर्गत असलेले पथ दिव्ये अनेक ठिकाणी बंद असल्यामुळे अंधाऱ्या रात्रीत काळा कुठं अंधार पडला असल्यामुळे सदरच्या एमआयडीसी कार्यक्षेत्रात शुकशुकाट असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील कृष्णुर एमआयडीसी अंतर्गत असलेल्या कीर्ती गोल्ड पासून ते मेडिकल कंपनी पर्यंत अंधाराचे साम्राज्य पसरले असल्यामुळे सदरच्या कंपन्यां मध्ये काम करून घराकडे जाणाऱ्या मजूर वर्गांना अंधाराचा सामना करत घरा कडे जावे लागत आहे
कृष्णूरची औद्योगिक वसाहत झकझकाट राहण्या विना काळ्या कोठ अंधारात असताना सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी नावालाच असल्याचे या भागातील जनतेतून व नागरिकातुन बोलल्या जात आहे

0 Comments