Header Ads Widget

नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडीत काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील चव्हाण नूतन सभापती तर भाजपाचे उपसभापती म्हणून शिवराज पाटील होटाळकर यांची निवड काँग्रेस भाजप युती पक्की !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची चर्चा असलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात आली आहे
या निवडीमध्ये काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील चव्हाण यांची सभापती तर भाजपाचे शिवराज पाटील होटाळकर यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे
माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्यात पंजा व कमळाची युती पक्की  !! -

राज्यात बाळासाहेबाची शिवसेना व भाजपाची युती असताना सुद्धा नायागांव व कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान काँग्रेस पक्षाचा पंजा तर भाजपाच्या कमळाची युती पक्की झाली असल्यामुळे नायागांव व कुंटूर काँग्रेस युती भाजपाची सत्ता स्थापन करण्यात आली असून सदरच्या नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड दिनांक २२ मे २०२३ रोजी करण्यात आली आहे 
जिल्ह्याच्या नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अनेक राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागून होते व या मार्केट कमिटीच्या खुर्चीवर नूतन सभापती व उपसभापती म्हणून कोण ? विराजमान होणार यांची सर्वांना उत्सुकता मोठ्या प्रमाणात होती परंतु दिनांक २२ मे २०२३ रोजी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सभापती म्हणून काँग्रेसचे श्रीनिवास पाटील चव्हाण यांची निवड करण्यात आली तर भाजपाचे शिवराज पाटील होटाळकर यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे

नायगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण व नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरच्या निवडणुकीत समझोता केला आहे

काँग्रेस पक्षांच्या बाजूने बारा उमेदवार बिनविरोध काढण्यात आले तर भाजपाचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सहा उमेदवार बिनविरोध काढून सत्ता स्थापन करण्यासाठी दिशा दाखवली आहे

Post a Comment

0 Comments