Header Ads Widget

राजकारणातील प्रभावी व्यक्तीमत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सेवा निवृत्त होणार ?


माधव पवार / नागोराव शिंदे-  नायगाव फास्ट न्यूज थेट मुबंई :- नेटवर्क  :- 

काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी आज कुठल्या ही राजकीय पदावर न राहण्याचा अर्थात एक प्रकारे राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

संसदेतील राज्यसभेच्या सदस्यत्वाचा ३ वर्षांचा कालावधी शिल्लक असल्यानं त्यामुळं या तीन वर्षात देशातील आणि राज्याच्या प्रश्नां मध्ये अधिकाधिक लक्ष घालणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केले आहे

राज्यसभेच्या सदस्यत्वा व्यतिरिक्त इतर कुठली ही जबाबदारी घेणार नसल्याचे ही शरद पवारांनी स्पष्ट केले असून राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी ही घोषणा केली  राजकारणातील प्रदीर्घ कालावधीनंतर कुठे तरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितलोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमात  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत मोठी घोषणा केली अध्यक्ष पदावरून राजीनामा देणार असून पक्षातील जेष्ठ मंडळी नव्या अध्यक्षाची नियुक्ती करतील अशी अपेक्षा मा.शरद पवार यांनी केले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या या घोषणे नंतर सभागृहातील कार्यकर्त्यांनी थेट व्यासपीठावर येत शरद पवार यांना विनवणी करण्यास सुरवात केली आहे

पवार यांच्या नावाच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले काही दिवस अजित पवार यांच्या भाजपा सोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते  त्यातच शरद पवार यांनी केलेल्या या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय क्षेत्रात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 



Post a Comment

0 Comments