नायगाव / उमरी -
सध्याच्या परिस्थितीमध्ये उन्हाळ्याचे दिवस कडाक्याचे असल्याने आणि गावात पाण्याची टंचाई उद्भवली असताना बोअर अधिग्रहण प्रस्ताव देण्याच्या कारण समोर करून उमरी पंचायत समिती कार्यालयातील दोन अधिकाऱ्यात फ्रीस्टाइल हाणामारी झाली असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना ऐकावयास मिळत असून या सदरच्या हाणामारी मध्ये एका अधिकाऱ्याने टेबलावर असलेल्या नेम प्लेटने नेम धरुन दुसऱ्या अधिकाऱ्याचे डोके फोडले असल्याचे सांगण्यात येते
पंचायत समिती कार्यालयात झालेल्या हाणामारीच्या संदर्भात उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत असून यातील आरोपी उध्दव संभाजी आराळे कनिष्ठ सहाय्यक यांच्याकडे गेल्या दहा ते पंधरा दिवसा पासून बोअर अधिग्रहणाचा प्रस्ताव देण्यात आला होता धूळखात पडलेल्या बोअर प्रस्तावाला अधिग्रहणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे द्यायाचे असे सांगितले होतेकनिष्ठ प्रशासन अधिकारी उत्तम मुंबईकर त्यांच्या अनेक वेळा विनंती केली होती परंतु सदरचे अधिकारी उध्दव आराळे यांनी प्रस्ताव देणे माझे काम नसल्याचे सांगत ते काम स्वामी यांचे काम असल्याचे सांगत सदरचा अधिग्रहणाचा प्रस्ताव टेबलवर फेकून दिला असल्यामुळे पंचायत समिती उमरीच्या दोन अधिकाऱ्यात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर फ्री स्टाईल हाणामारी मध्ये झाले असल्याने पंचायत समितीच्या इतर कर्मचाऱ्यासह जनतेत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
उध्दव आराळे यांनी टेबलावर ठेवलेली लाकडाच्या नेम प्लेटने उत्तम मुंडे यांच्या डोक्यात मारून डोके फोडले मुंडकर यांच्या रक्तबंबाळ झाल्याने जखमी झाले आहे
मुंडकर यांना तात्काळ उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी सदरची घटना ही चार ते पाच दिवसाखालची असल्याचे उमरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सांगितले आहे
यासंदर्भात उमरी पोलीस ठाण्यात परस्पराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील हे करीत आहे

0 Comments