Header Ads Widget

माळइकळी येथे बारा जणावर ॲट्रॉसिटी दाखल चार अटक ९ फरार गावांत तणाव पूर्ण शांतता कुंटूर पोलीसाचा बंदोबस्त

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ईकळीमाळ येथे दलित व सुवर्णात झालेल्या हाणामारी मध्ये एकाचे डोके फुटले तर दुसरा जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी कुंटूर पोलीस ठाण्यात बारा ते तेरा जणाच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत ॲट्रॉसिटी ऑक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली तर नऊ आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईकळीमाळ
येथील संत परबतेश्वर महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी लग्नाची वरात मुख्य रस्त्यानी जात असताना या वरातीच्या दरम्यान फटाके उडवल्याच्या कारणा वरून झालेल्या दलित व सुवर्णातील वाद अगदी टोकाला गेला आहे
ईकळीमाळ येथे झालेल्या दगड फेकीत याच गावातील शंकर जमणाजी जोंधळे व हणमंत रामचंद्र सूर्यवंशी हे वरात जाताना त्यांच्या घराच्या समोर असल्याचे सांगण्यात येते या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करण्यात अल्यामुळे झालेल्या बाचा बाचीतुन हाणामारीत रूपांतर झाले व एकाचे डोके फोडले तर सूर्यवंशी यात जखमी झाले आहे
कुंटूर ठाण्या पासून दोन ते आडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या माळ ईकळी येथील रहिवासी असलेल्या बारा ते तेरा जणावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

यात ४ जणाला धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या आदेशानुसार ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी बालाजी गणपती पुयड, माधव बाबाराव पुयड, गजानन गणपती पुयड, साईनाथ जगदेराव सुगावे यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलीसांनी माहिती दिली आहे
माळईकळी येथील गावाची लोकसंख्या एकूण एकविशे ते २२०० असून या गावांत सर्व धर्माचे बांधव नांदत असतात यात मराठा,धनगर,मातंग,बौद्ध,मुस्ल्लीम,वारिक,वरटी ,
गवंडी,कुलेकडगी,गोसावी आदी समाजाचे लोक नांदत असतात परंतु या गावात अधून मधून सुवर्ण दलित वाद हा नेहमीसाठी होत असतो आणि पोलीसांना गावांत पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागतो असे अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय अटकोरे, बिट जमादार संतोष कुमरे पॉ.का. अशोक घुमे यांनी चौख बंदोबस्त ठेवला आहे 


Post a Comment

0 Comments