Header Ads Widget

वादग्रस्त गावाची वादग्रस्त काहणी माळ ईकळी येथे चालते तरी काय ? पोलिसांना वेळोवेळी करावे लागते पोलीस तैनात गावांत !!


माधव पवार /
मारोती इबितवार -


नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या माळईकळी येथील वादग्रस्त गावाची वादग्रस्त कहाणी या गावांत नेमके चालते तरी काय ? कुंटूर पोलिसांना वेळोवेळी करावे लागते पोलीस तैनात गाव गुणागोविंदाने चालत असताना येथे समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा कोण करतोय प्रयत्न यांचा प्रथम तपास पोलिसांनी घेतला पाहिजे नेहमीच्या कोणत्या न कोणत्या करणा वरून वाद होत असल्याने गावाचे वातावरण तंग होत आहेतालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गावांत वेळोवेळी होत असलेला तणाव शांत करण्यासाठी बैठाका घेतल्या जातात आणि वातावरण ही काही काळा पुरते शांत होते काही आठवड्यात परत एकदा वादाची ठिणगी पेटते कुंटूर पोलीसाना सदरचे गावातील वातावरण शांत करण्यासाठी गावांत पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे

""गावांत शांतता पूर्ण तणाव सपोनि महादेव पुरी ""


कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इकळीमाळ येथे गायराणाच्या वादातुन झालेल्या हाणामारी दरम्यान गावांत शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी दंगल नियंत्रण विभागाच्या गाडीला पाचरण करण्यात आले असले तरी इकळीमाळ गावात शांतता पूर्ण तणाव असल्याचे सपोनि महादेव पुरी यांनी सांगितले असून पुढील कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखी फौजदार संजय अटकोरे बिट जेमादार संतोष कुमरे पॉ का अशोक घुमे यांनी गावात पोलीस तैनात केला आहे 
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माळईकळी येथे गायरान जमिनीच्या वादातून झालेल्या बाचाबाचीत दोन गटात हाणामारी झाली असल्याने परत एकदा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले यातील एका गटांनी दुसऱ्या गटाच्या घरात घुसून हल्ला चढविला असल्यामुळे या हाणामारीत फुटले असल्याचे वास्तव चित्र  दिनांक ४ मे २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे

कुंटूर ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हे दाखल करण्यात आले असून वेळीच तहसील प्रशासन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन गायरणाचा तोडगा काढला असता तर असा प्रकार इकळीमाळ येथे घडला नसता हे सत्य आहे 







Post a Comment

0 Comments