Header Ads Widget

परीक्षा केंद्र परभणी जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा नीटचा पत्ता दिला नांदेड जिल्ह्यात

       माधव पवार 
शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वर अनेक वेळा चुका होत असल्यामुळे विद्यार्थी बुचकळ्यात पडतात तसा एक प्रकार शिक्षण विभागात दिसून आला आहे

दिनांक ७ मे २०२३ रोजी होत असलेल्या  विध्यार्थीच्या नीटच्या परीक्षा दरम्यान घुंगराळा येथील रहिवासी असलेल्या एका विध्यार्थीना अनुभव आला या परीक्षाचे संटर दिले परभणी जिल्ह्यातील श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा असे दिले विध्यार्थीच्या हॉल टिकीटवर नांदेड जिल्ह्याचा पत्ता दिल्यामुळे सदरच्या विध्यार्थीच्या भविष्याचे काय असा प्रश्न चर्चेला जात आहे

नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले परबता शंकरराव हणमंते यांचा मुलगा स्वप्ननिल परबतराव हणमंते हा मुलगा नांदेड येथे नीट परीक्षेची तयारी करत असून सदरच्या विध्यार्थीना परीक्षेचे हॉल टिकीट मिळाले असता त्यावर परीक्षा केंद्र परभणी जिल्ह्यात देण्यात आले तर पत्ता मात्र नांदेड जिल्ह्याचा देण्यात आला असला तरी सदरचे या नावाचे नांदेड जिल्ह्यात कॉलेज नसल्याचे त्यांच्या वडिलानी सांगितले आहे 

परीक्षा केंद्र परभणी जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा नीटचा पत्ता दिला नांदेड जिल्ह्यात दिला असल्यामुळे विध्यार्थीच्या पालकासह विध्यार्थीत संताप व्यक्त केला आहे

शिक्षण विभागा कडून झालेली चूक तात्काळ सुधारून घेऊन सदरच्या विध्यार्थीना परीक्षेचा अचूक पता दयावेत कारण ही परीक्षा दिनांक ७ मे रोजी असल्यामुळे विध्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यांची काळजी शिक्षण विभागाने घेण्याची गरज आहे 

Post a Comment

0 Comments