Header Ads Widget

हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस एस आमले यांच्यासह गोरेगाव व कुरूंदा यांना पोलीस अधीक्षका कडुन प्रशस्तीपत्रक व बक्षीस जाहीर !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक एस एस आमले यांना हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतुन जिल्हयातील सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी कमी करणे प्रलंबित गुन्हे व तक्रारी अर्ज प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याचे काम पोलीस आमले यांनी केले आहे

शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत लपून छपुन सुरू असलेले अवैध धंद्यावर अंकुश ठेवून कार्यवाई मोहीम तसेच जनता व पोलीस सुसंवाद अधिकाधीक वाढविण्यासाठी त्याच बरोबर विवीध उपक्रम राबवुन रात्रीचा पोलीस राउंड वाढवून कोम्बींग ऑपरेशनच्या माध्यमातुन चोरींला आळा गुंडेगिरीला धडा शिकविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण एस एस आमले यांचे पोलीस अधीक्षक यांच्या कौतुक करण्यात येत आहे

हिंगोली शहर यांनी पहीला तर पोलीस स्टेशन गोरेगाव यांना द्वितीय व पोलीस स्टेशन कुरूंदा यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. नमुद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हिंगोली शहर पोनि एस एस आमले यांना प्रथम क्रमांक बददल प्रशस्तीपत्रक व १८०० रू. रोख बक्षीस सोबत सी-नोट, द्वितीय क्रमांका बददल पो.स्टे. गोरेगावचे प्रभारी अधिकारी रवि हुंडेकर यांचा समावेश आहे 

प्रशस्तीपत्रक व १५०० रू. रोख बक्षीस सोबत सी-नोट तर तृतीय क्रमांका बददल पो.स्टे. कुरूंदा चे प्रभारी अधिकारी सपोनि गजानन मोरे यांना प्रशस्तीपत्रक १२०० रु. रोख बक्षीस व सोबत सी-नोट असे बक्षीस मा. पोलीस अधीक्षक यांचे कडुन जाहीर करण्यात आले आहे

जिल्हयातील सर्व १३ हि पोलीस स्टेशनमध्ये वरील सर्व बाबी व ईतर प्रमुख बाबींनुसार प्रभावी कामगिरी व्हावी यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक महीण्यात सर्व १३ हि पोलीस स्टेशनचे कामगीरीचे मुल्यांकन करून व सर्वकंप बाबींचा आढावा घेवुन उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्तव्यदक्ष ३ पोलीस स्टेशनची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

सदरील मोहिमे नुसार एप्रिल २०२३ या महिन्याच्या मासिक अहवालाचे व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे अवलोकन व मुल्यांकन केले व उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्तव्य दक्ष ३ पोलीस स्टेशनच्या म्हणजे हिंगोली शहर गोरेगाव व कुरूंदा यांची निवड करण्यात आली आहे



Post a Comment

0 Comments