Header Ads Widget

हिमायतनगरच्या दोन पत्रकारासह सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला यश अखेर भैसा ते पळसपूर मार्गे उमरखेड बस सेवा चालू - या विभागाचे राजकीय पुढारी नावालाच


विशेष प्रतिनिधी : नागोराव शिंदे -

नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यातील दोन पत्रकारांसह एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या अखेर पाठपुराव्याला येस प्राप्त झाले असून दिनांक ८ मे २०२३ रोजी भैसा ते पळसपूर मार्गे ढाकणी उमरखेड हिमायतनगर बस सेवा काही तांत्रिक अडचणीमुळे राज्य परिवहन महामंडळाची बस बंद करण्यात आली होती

राज्य परिवहन मंडळाचे कर्तव्यदक्ष अधिकारी अमृता मोधळकर भैसा आगार प्रमुख व उमरखेडचे आगार प्रमुख वाकडे वाहतुक निरीक्षक सुरेश मोरे यांचे सुद्धा जनतेसह प्रवाशी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे 

या पळसपुर मार्गावरील सदरची बस चालू करण्यात यावी म्हणून सदरच्या दोन पत्रकारांसह एका सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन बाजी देऊन बंद करण्यात आलेली बस सेवा परत एकदा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस चालू करण्यासाठी कोणत्याही राजकीय पुढार्‍यांनी लक्ष दिले नसल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून हिमायतनगर येथील नायगाव फास्ट न्यूज हिमायतनगरचे विशेष तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे यांच्यासह पत्रकार इरफान पठाण त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ता हिरासिंग चव्हाण यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे

महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे सततचा पाठपुरावा करून सदरची बस चालू केली असल्याने हिमायतनगर च्या दोन पत्रकारासह एका कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी या विभागाचे राजकीय पुढारी नावालाच असल्याची चर्चा आता प्रवाशातून होताना ऐकावयास मिळत आहे 


Post a Comment

0 Comments