Header Ads Widget

खा.संजय राऊत यांच्या मुलाखतीकडे लागले नांदेडकरांचे लक्ष १९ मे २०२३ रोजी प्रकट मुलाखत दै.सत्यप्रभाचा उपक्रम

 
नांदेड / धर्माबाद : अनंतोजी कालिदास :- 

आपल्या रोखठोक भूमिकेमुळे महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे शिवसेना नेते व दै.सामनाचे कार्यकारी संपादक खा.संजय राऊत यांच्या मुलाखतीकडे आता नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. त्यांची दि.१९ मे २०२३ रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांची प्रगट मुलाखत होणार आहे.

दै.सत्यप्रभाने नव्यानेच उभारलेल्या कै.रामगोपाल गुप्ता औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथील दै.सत्यप्रभा कार्यालयाच्या प्रांगणामध्ये शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी  सायंकाळी ६ :३०:वाजता त्यांची प्रगट मुलाखत होणार आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून दै.सकाळ माध्यम समुहाचे मुंबई येथील वरिष्ठ पत्रकार संजय मिस्कीन खा.संजय राऊत यांना बोलतं करणार आहेत.

महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये व त्यानंतर झालेल्या बंडाच्या काळात त्यांनी विरोधकांना अंगावर घेत राज्यामध्ये एक आक्रमक नेता व पत्रकार म्हणून छबी निर्माण केली आहे. या पार्श्‍वभूमीवर खा.संजय राऊत तब्बल २० वर्षांनंतर पहिल्यांदाच नांदेडला येत आहेत

याचेच औचित्य साधून दै.सत्यप्रभाने प्रगट मुलाखतीचे आयोजन केले आहे अशी माहिती दै.सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments