Header Ads Widget

गुरुजी रुग्णालयाद्वारे गरजूंना कृत्रिम मॉड्युलर हात पायांचे वितरण


      राजकुमार पाटील मंगनाळे

शहरातील नामांकित गुरुजी रुग्णालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध समाजातील विकलांग व्यक्तींना सामान्य लोकांना स्वकर्तुत्वावर जगता यावे यासाठी भारत परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे ही समाजातील विकलांग लोकांसाठी आधार बनली आहे.

या केंद्राच्या माध्यमातून नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयाच्या संयुक्त सहकार्यातून नांदेड येथे आज रोजी 2.5 कोटी रुपयांचा कृत्रिम कॅलिपर्स मॉड्युलर हात व पाय यांचे वितरण करण्यात आले आहे.

याकरिता एम.एन.जी.एल.जी.ए.आय.एल. इंडिया लिमिटेड बी.पी.सी.एल. यांचे संयुक्त प्रकल्प अंतर्गत अनुदान लाभले या शिबिरात महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यासह कर्नाटक व तेलंगणा राज्यातील दिव्यांगांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी ३७० दिव्यांग बंधू भगिनींना कृत्रिम मॉड्युलर हात पायांचे वितरण करण्यात आले,  या सोबतच श्री गुरुजी रुग्णालयाच्या श्री मथुरा शांती प्रतिष्ठान या नूतन व्यवस्थापनाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

हा सोहळा श्री सुहासराव हिरेमठ (ज्येष्ठ प्रचारक तथा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य) श्री राजन जोग (राष्ट्रीय सचिव सेवा प्रकल्प भारत विकास परिषद) मा. श्रीकृष्ण कोकाटे (पोलीस अधीक्षक, नांदेड) डॉक्टर सुधीर कोकरे (मा. जिल्हा संचालक राज्य नांदेड) श्री प्रसाद, संस्थापक अध्यक्ष श्री डॉ. लक्ष्मीकांत बजाज अध्यक्ष मथुरा शांती प्रतिष्ठान नांदेड या मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी केलं असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून व नूतन कार्यकारणीच्या वार्षिक उपलब्धी व पुढील वाटचाल याबाबत सविस्तर कथन करून रुग्णसेवेकरिता दातृत्व भाव म्हणून सढळ हस्ते जमेल ते योगदान द्यावे असे आवाहन केले.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक मा. श्रीकृष्ण कोकाटे यांनी आशा उपक्रमास त्यांच्या विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील असे अस्वस्थ केले आहे.

इतर मान्यवरांनी अवचित्यनुसार येथे मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप करताना श्री सुहासराव हिरेमठ (संघाचे जेष्ठ प्रचारक राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य) यांनी सांगितले की, समाजाने स्वतःच्या आमदानीतून काही खर्च हा सामाजिक बांधिलकी म्हणून करावा, जेणेकरून गरजवंतांना योग्य त्या सोयी सुविधा मिळू शकतील. संवेदनशील समाज हा सुदृढ समाज असतो आणि तेव्हाच बलशाली भारताचे स्वप्न साकार होईल असेही यावेळी म्हणाले.

यावेळी भारत विकास परिषदेचे श्री विनायक खटावकर, श्री राजन जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, राजन देशपांडे, राजाभाऊ कदम, वासुदेव कालारा आणि शर्माजी हे उपस्थित होते.
नंदिग्राम वैद्यकीय सहकारी संस्थेचे डॉ. सुधीर कोकरे, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. तुंगेंनवार, डॉ. अतुल काबरा, डॉ. संजय पतंगे, डॉ. शैलेश कुलकर्णी, श्री अमोल आंबेकर या संचालक मंडळाने उपस्थित लावली होती. तसेच अवयव जोडणी तज्ञ म्हणून  श्री वासुदेव कालारा, प्रशांत सातपुते, विजय गोरे, शंतनू नायक, विक्रम महाडिक, संजय शर्मा व बोरगावकर आदींनी काम पाहिले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अर्चना बजाज यांनी तर सूत्रसंचलन डॉ. शेखर चौधरी व ऋणनिर्देश डॉ. संजय पतंगे यांनी व्यक्त केला हे शिबिर यशस्वी करण्याकरिता श्री गुरुजी रुग्णालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व डॉक्टरांच्या समूहाने गेले पंधरा दिवस आथक परिश्रम करून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला अशी माहिती मा. श्री संजय बजाज (व्यवस्थापक, श्री गुरुजी रुग्णालय नांदेड)  यांनी दिली.

Post a Comment

0 Comments