माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह माजी मंत्री तथा खा.स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे सुपुत्र राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक काँग्रेस आणि भाजपात युती करून लढविण्यात आली असल्यामुळे या सदरच्या निवडणुकी मध्ये मा.राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या गटाचे दहा तर चव्हाण गटाचे आठ असे उमेदवार भरघोस मताने सदरच्या निवडणुकीत विजयी झाले होते
दिनांक २१ मे २०२३ रोजी सभापती व उपसभापतीची निवड होणार असल्याने कुंटूर मार्केट कमिटीच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी नूतन सभापती म्हणून राजेश देशमुख कुंटूरकर यांचे मेहुणे मा.अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर व उपसभापती म्हणून माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्व. रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे चिरंजीव मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या नावाची चर्चा नव्हे फिक्स जोडी मार्केट कमिटीच्या खुर्चीवर विराजमान होणार ? असल्याच्या चर्चेला मोठा नायगाव तालुक्यात वेग वाढला आहे
माजी मंत्री तथा खा. स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश देशमुख कुंटूरकर यांचे छोटे बंधू रुपेश देशमुख कुंटूरकर हे सुद्धा मार्केट कमिटीच्या निवडणुकी मध्ये निवडून आले असले तरी सदरच्या मार्केट कमिटीचा सभापती म्हणून मेहुना की बंधू अशी चर्चा होत अजून होत आहे
सदरच्या निवडीचे डिसिजन राजेश देशमुख कुंटूरकर यांच्याकडे असल्याने त्यांचे लाडके मेहुणे बरबडा नगरीचे विद्यमान सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांच्या नावाची सभापती म्हणून कुंटूरकर घोषणा करतील ? तर उपसभापती म्हणून मनोज पाटील टाकळीकर यांच्या नावाची घोषणा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह बरबड्याचे सरपंच बालाजी मदेवाड व प्रचार्य मनोहर पवार हे करतील असी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

0 Comments