Header Ads Widget

शेतकऱ्यासह जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनो जरा भानावर या जनतेचा सवाल

        माधव पवार
राज्यात वादळी वाऱ्यासह गारांचा मारा मेघ गर्जनेसह धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातले पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना सुद्धा एकीकडे  राज्यातील राज्यकर्ते मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहेत
तर दुसरीकडे आकाशातील विजा कोसळून अनेक लोक व जनावरे मृत्यूमुखी पडत असताना सुद्धा या राज्यातल्या राज्यकर्त्यांना कसल्याच प्रकारचे देणे घेणे नसल्यामुळे शेतकरी व जनता संकटात सापडली व नेते मंडळी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहण्यातच दंग आहेत
गेल्या वर्षापासून राज्यात सत्ता संघर्षाचा खेळखंडोबा झाला असला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये एक नवीनच फंडा निर्माण झाला राज्याचे मुख्यमंत्री कोण ? होणार कसे होणार असे जनतेचे लक्ष राजकीय नेते मंडळीनी वेधून घेतले आहे

परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताच राज्यातला राज्यकर्ता बोलत नसल्यामुळे शेतकऱ्यासह जनतेला हैराण व्हावे लागत असताना सुद्धा राज्यातले नेते पंडित एकापेक्षा एक काय दिवा लावणार असा सवाल ही जनतेनी सवाल केला आहेगेल्या चार ते पाच दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत असल्याने गोरगरीब लोकांच्या घरावरील टीना पत्रे उडून जाऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत  जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत विजा कोसळून मानवहानी होत असताना सुद्धा या राज्यातल्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यासह जनतेकडे लक्ष देण्यासाठी कसा काय वेळ मिळत नाही असे ही सदरच्या जनतेतून बोलले जात असले तरी या नेत्यांना आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न चांगलेच रंगवित असल्याने नेत्यानो जरा बहाणावर या असा सवाल जनतेनी केला आहे

शेतकऱ्यासह जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनो जरा भानावर या असा सवाल जनतेनी केला आहे 

Post a Comment

0 Comments