माधव पवार / नागोराव शिंदे :-:
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील बोथी तलावात पोहोत असताना तलावाच्या पाण्याची पातळी खोल असल्याने मित्राने मित्राचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता मित्रानो स्वतःचा जीव धोक्यात घालून मित्रासाठी मित्र जीव लावत होता परंतु सदरील सोबतचा मित्र पाण्यात बुडत असताना त्याला त्यांचा मित्र वाचण्यासाठी जीवाची बाजी लावून वाचवण्याचा प्रयत्न करीत होता
अखेर मित्राला याबाबतीत सदरच्या मित्राला वाचविण्यासाठी यश मिळत नव्हते आणि त्यांचे मित्र त्यासाठी प्रयत्न करीत होते परंतु मित्राचा पाण्यात बुडून अंत झाल्याच्या नंतर त्यांच्या मित्राला ही दुःख आवरणाशी झाले होते पाण्यात बुडालेला मित्र दीपक यांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करीत असले तरी सदरच्या दीपकचे प्रेत रात्री पर्यंत सापडले नसल्यामुळे शोध कार्य चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे
या प्रकरणी कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील रहिवासी असलेला दीपक किशनराव मारकळ वय २१ वर्ष हा त्यांचा मित्र रायाजी विठ्ठल खंदारे यांच्या सोबत दिनांक २७ मे २०२३ रोजी दुपारी १ ते पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान गावा लगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला होता असे कळमनुरी पोलिसांनी सांगितले आहे.
सदरची घटना ही आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडली असल्यामुळे ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक पांढरीनाथ बोधनापोड यांना सदरच्या घटनेची माहिती काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शिवाजीराव बोंडले यांच्या त्यांची पोलीस टीम मधील हिवरे वानोळे, यांच्यासह आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहे
तलावात पोहत असताना दीपकच्या अंगात वात आली असल्यामुळे त्यांचे हात पाय वाकडे झाले होते दीपकने त्यांचा मित्र रायाजी यांना आवाज दिला व मला वाचावं असी अपेक्षा त्यांच्याकडे करीत होता दीपकला बुडून जात असताना त्यांचा मित्र दोन वेळेस वर काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु हातून सुटल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून अंत झाला पुढील तपास पोलीस करीत आहेत

0 Comments